Home समाजकारण गोदामाई प्रतिष्ठानची नाशिक स्वच्छता अभियानाला सुरुवात –

गोदामाई प्रतिष्ठानची नाशिक स्वच्छता अभियानाला सुरुवात –

नासिक कार्यकारी प्रमुख अध्यक्ष अभिनेत्री सृष्टी देव ची माहिती

हेमंत शिंदे(नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा) 

महाराष्ट्र राज्य गोदामाई प्रतिष्ठान चे राज्य अध्यक्ष मा. आदिनाथजी ढाकणे व लोकप्रिय मराठी अभिने ते चिन्मय उद्घगीरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गोदामाई प्रतिष्ठानची नासिक प्रमुख कार्यकारी अध्यक्ष सृष्टी देव, उपाध्यक्ष आबासाहेब देव, सदस्य मारुती देवकर, हेमंत शिरोड़े यांच्या प्रमुख सहभागाने व अन्य लोकांच्या मदतीने नासिकच्या पवित्र परंतु लोकांनी टाकाऊ वस्तु टाकून अपवित्र केलेल्या गोदावरी नदीची रविवारी स्वछता करुन नासिक शहरा मध्ये राबविण्यात येणा-या अभियानाची उद्धघाटन करुन सुरुवात करण्यात आली.

अभियानाच्या पहिल्या आठवडयात गोदावरी नदीच्या पात्रात लोकाकडून टाकण्यात आ लेले निर्माल्य, नदीत टाकण्यात आलेले फोटो, दुभैंगलेल्या मुर्ती, पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स, दारूच्या बाटल्या या सारख्या नदी चे प्रदुषण करणाऱ्या व पर्यावरणा ला हानी पोहचवीणाऱ्या हानिकारक वंस्तुची सफाई करण्यात आली.

या स्वच्छता अभियानाची नाशिकची प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अभिनेत्री सृष्टी देव हिच्या कार्याचे नाशिक च्या नागरिकानी कौतुक केले असून या स्वछता अभियानाला पाठिंबा दिला आहे.

Previous articleआ. माधवराव पाटिल जवऴगावर यांच्या हस्ते शेतकरी सुरोशे यांचा सत्कार…
Next articleअखेर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण