Home Breaking News हिमायतनगर तालुक्यातील पांदण रस्त्याला लागला ब्रेक.

हिमायतनगर तालुक्यातील पांदण रस्त्याला लागला ब्रेक.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 18 मार्च 2025

तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळात चालु केलेली मातोश्री पांदण रस्ता योजनेला सध्या तरी ब्रेक असल्याने पांदण रस्त्याचे काम बंद आहे. पंचायत समिती कार्यालय हिमायतनगर येथे विचारणा केली असता मातोश्री पांदण रस्ते योजनेला सध्या निधी नसल्यामुळे पांदण रस्ते बंद आहेत. असे समजले आहे.

शेतक-यांच्या शेतातील माल त्यांच्या घरापर्यंत नेणे-आण करण्यासाठी, टॅ्क्टर आदी चारचाकी वाहणे, बैलगाडी शेतात जाण्यासाठी हि मातोश्री पांदण रस्ते योजना शेतक-यांच्या दृष्टीने हिताची असल्यामुळे शेतक-यांना आपली शेती कसण्यासाठी अतिशय सुलभ योजना होती. परंतु या मातोश्री पांदण रस्ते योजनेचा निधी इतरत्र वळविल्यामुळे हि योजना तात्पुरती बंद केली असावी असाही कयास शेतकरी लावत आहेत. परंतु हि योजना लवकरात लवकर चालु करुन शेतक-यांना दिलासा द्यावा. अशी मागणी जोर धरत आहे.

Previous articleखुलताबाद येथे असलेल्या क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर हटविण्याची विश्व हिंदू परिषदेचे मागणी..
Next articleसाईनाथ गटकेपोड यांची एम.एस.ई. बी. मध्ये ज्युनीयर असीस्टंट पदी नियुक्ती.