से. नि. मु.अ. एन. के. अक्कलवाड यांचे प्रतिपादण.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड
मराठवाड्यात नव्हेतर संबंध महाराष्टा्त पेरकेवाड,पेरणी समाज ईतर समाजाच्या तुलनेत फार कमी आहे. समाजाच्या हितासाठी, समाजातील शिक्षण घेणा-या भाविपिढीसाठी समाजाने एकोप्याने चांगले काम केल्यास निश्चितच आपल्या समाजाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले.
हिमायतनगर तालुक्यात नुकतीच पोलीस जमादार अशोकराव सिंगणवाड यांच्या घरी 24 मार्च रोजी नागनाथराव अक्कलवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली पडली.
या बैठकीत
सन 2012 रोजी येथील वधुवरपरीचय मेळावा, सन 2014 मध्ये बिलोली येथील गुणवंतांचा मेळावा यांची चर्चा करण्यात आली. यावेळी शासकीय, निमशासकीय आणी काही लोकप्रतिनिधींनी देखील देणगी दिली. आतापर्यंत समाजबांधवांकडुन जमा झालेल्या निधीचा खर्चाचा हिशोब देण्यात आला. यावेळी हिमायतनगर समाज बांधवांनी एकमुखाने मान्य केला. कोणाची काही अडचण असल्यास विचारा असे स्पष्टपणे अध्यक्ष गजानन तिप्पनवार यांनी समाज बांधवांना विचारले. काही समाज बांधवानी देणगी देतांना चेक दिले होते ते चेक त्यावेळी बांऊस झाले. असे जिल्हा कार्यकारिणीने यावेळी सांगितले.
यावेळी मराठवाडा पेरकेवार समाजाचे पदाधिकारी बालाजी कंदलवार, दिलीप अनगुलवार, दिनेश डुम्मनवार, सदस्य किशनराव अनगुलवार, परमेश्वर गोपतवाड, देवराव पाटील गोपेवाड, बाबुराव कनमले, अशोक अनगुलवार, बिलोली तालुकाअध्यक्ष साईनाथ अंकतवाड, आनंदराव मुतनेपवाड, मारोती अक्कलवाड पाटील, दत्तात्रय गटकपवाड, कैलास अनगुलवार, गणपत पुजरवाड, परमेश्वर अक्कलवाड, विठ्ठलराव अक्कलवाड, परमेश्वर कटकमवाड, राजाराम कटकमवाड,बंडुभाऊ अनगुलवार, गजानन गोपेवाड, अशोक सुब्बनवाड, सतिश गोपतवाड, पोशटी अक्कलवाड, माधवराव अक्कलवाड, बाबुराव अक्कलवाड, प्रकाश दासरवाड, ओम अनगुलवार, गोविंद गोपेवाड आदी समाज बांधवांची उपस्थीती होती.