👉 *वास्तव*
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड
महाराष्ट्राच्या पवित्र पावन भुमीत अनेक थोर साधुसंतांची समाजाचला प्रबोदन, किर्तन, प्रवचन करुन सांगितले आहे. जुन्या रूढी, परंपरा, बालविवाह, सतीपध्दती, अंधश्रध्दा, अज्ञान, हुंडापध्द्ती अशा परंपरा कायमस्वरुपी समाजातुन घालविण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. परंतु वरील काही समस्या बंद झाल्या असल्या तरी मात्र हुंडापध्दती समाजाला आजही पोखरुन काढत असल्याचे भिषण वास्तव चित्र समाजामध्ये सध्यातरी मोठ्या प्रमाणावर दिसत आहे.
हुंडा म्हणजे काय? वधुपित्यांने वर पित्याला दिलेली देणगी. वधु पित्याने आपली मुलगी देऊन सोबतच पैसाअडका, सोनंनाणं , जमीन जुमला हे वर पित्याला देणे म्हणजेच हुंडा होय.
या हुंडापध्दतीमुळे समाज चांगलाच कंगाल होतांना दिसतोय. आपले सर्वस्व पणाला लावत वधुचे आईवडील आज मोठ्या ताणतणावात आपले जिवंण जगत आहेत. हे वास्तव विसरता येणार नाही…लाखो रूपयावर जाऊन पोहचलेला हुंडा आजरोजी समाजालातील भिषण समस्येचे मुळ बनत चालले आहे. हि अनिष्ट हुंडापध्द्त बंद होऊन समाजातील मुल, मुली शिक्षण घेऊन उच्च पदावर आरुढ व्हावीत. समाजाला हुंडापध्दतीची लागलेली किडींचे समुळ उच्चाटटन व्हावे. हिच माफक अपेक्षा..