Home Breaking News जवळगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्यातून एक आदर्श गाव बनवन्याची सुवर्णसंधी ..

जवळगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्यातून एक आदर्श गाव बनवन्याची सुवर्णसंधी ..

माझी वसुंधरा अभियानात महाराष्ट्रात आदर्श ठरून गावाचा नावलौकिक लवकरच होईल – मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांचे प्रतिपादन….
हिमायतनगर| कृष्णा राठोड
तालुक्यातील जवळगाव येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत जवळगाव ग्रामपंचायत व लोकसहभागातून सात हजार वृक्ष लावून एक वर्षे झाल्याबद्दल वृक्षांचा प्रथम वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना जवळगाव येथुन सुरू करण्यात आली आहे.
दि.15 जुन रोजी संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून वृक्षाचा प्रथम वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षांचा प्रथम वाढदिवस कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा पाच हजार वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.शाळेच्या पहिल्या विद्यार्थ्यांकडून मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांचे वृक्ष दिंडी व माझी वसुंधरा अभियानाच्या घोषणा देत स्वागत केले.

यावेळी व्यासपीठावर बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर म्हणाल्या की माझी वसुंधरा अभियानात जवळगाव ग्रामस्थ ग्रामपंचायत ची संकल्पना यशस्वी ठरली असून यासाठी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी देखील याकडे लक्ष देऊन गाव महाराष्ट्रात आदर्श ठरेल हा त्यांचा मनोदय नक्कीच पुर्ण होणार असून जवळगाव ची हिंदू- मुस्लिम स्मशान भुमी देखील आज या वृक्षामुळे एक आदर्श ठरली असून माझी वसुंधरा अभियानात जवळगाव महाराष्ट्रात नावलौकिक ठरून आदर्श गाव होईल असे मत व्यक्त करीत जवळगावचा आदर्श जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने घ्यावा असे आवाहन वर्षा ठाकूर यांनी व्यक्त केले.

यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे,निलेश बंगाळे विस्तार अधिकारी, धर्मेकर,गटविकास अधिकारी मयुर आंदेलवाड,माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, सरपंच प्रतिक्षा पवार,उपसरपंच प्रसराम पवार,ग्रामसेवक शैलेश वडजकर, गजानन सुर्यवंशी,राजीव झरेवाड, दिगंबर पाटील,भाऊराव पाटील,नारायण काळे,नितेश पवार,पांडुरंग पाटील,माजी सरपंच गणपत नाचारे,जमील भाई, दयाळ गिर गिरी,गोविंद शर्मा, मुख्याध्यापक शिराळे, यांच्यासह जवळगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सरपंच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत गोवंदे यांनी केले तर आभार पवार यांनी मानले.

आ. जवळगावकरांच्या कार्याचे कौतुक
जनतेच्या कामासह हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील कामासाठी आ. माधवराव पाटील जवळगावकर हे आग्रही असतात त्यांच्या कामाची धडपड खुप आहे. मतदारसंघा बरोबर गाव देखील आदर्श ठरेल याकडे त्यांचे महत्त्व पुर्ण लक्ष असते असे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी जवळगावकरांच्या कार्याचे कौतुक केले.

Previous articleकल्याण डोंबिवली महानगर पालिकेरील धडक मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
Next articleहिमायतनगर किनवट राष्ट्रीय महामार्ग झाला चिखलमय