मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 02 एप्रिल 2028
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. येथे चालु असलेला गेल्या बारा वर्षापासुन अखंड हरिनाम सप्ताहमध्ये भजन, भारुड, हरिपाठ, रामायण कथा, काकडा, किर्तन असे नित्यनियमाने हनुमंत रायाच्या दरबारात सप्ताहात यावर्षी सर्वाधिक बालकिर्तन कारांनी श्रोत्यांना आजवर तरी मंत्रमुक्त केले आहे.
यामध्ये सवना येथील बालकिर्तनकार हभप प्रतिक्षादिदी संतोष अनगुलवार, हभप गणराज आलेवाड रायखोडकर यांनी उपस्थीत भक्तांना आपल्या किर्तनाच्या माध्यमातुन ईश्वर हा सर्वभुती आहे. प्रत्येक चराचरात ईश्वर आहे. ईश्वरा शिवाय मनुष्याचे जिवंत व्यर्थ आहे. भक्ती करा, व्यसन मुक्त व्हा, सतसंगत धरा अशा विविध विषयांवर आपल्या पवित्र वाणीतुन सुंदर किर्तनाची सेवा पाडली आहे. यामुळे सवना नगरी भजन, किर्तनाने एकंदरीत दुमदुमली आहे.
प्रत्येकांच्या अंतरंगात परमेश्वर आहे. तो कळला पाहिजे. ईश्वरांचे भजन केल्यास आंतर आत्म्याला सुखशांती प्राप्त होते असेही ते म्हणाले. हभप बाबुराव महाराज यांच्या पवित्र वाणीतुन अतिशय रसाळ , गोड शब्दातुन रामायणाची कथा ऐकायला मिळत आहे. गायनाचार्य हभप दत्ताजी नलावडे, पवनेकर पाटील, हभप साहेबराव महाराज बोरगडीकर, मृदंगाचार्य विदर्भ भुषण माने, झाकी कलाकार रामजी काईतवाड आदींची या अखंड हरिनाम सप्ताहात साथ मिळत आहे. भाविक भक्तांचे चांगले सहकार्य या निमित्ताने मिळत आहे. एकंदरीत हरीच्या नामात सवना नगरीतील भाविक भक्त दंग झाले आहेत.



