👉 वरीष्ठाचे दुर्लक्ष
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 09 एप्रिल 2025
हिमायतनगर तालुक्यातील सज्जा सवना ज. अंतर्गत असलेल्या नऊ गावात कृषी सहायकाच्या भेटी किती? कधी?केंव्हा?,कशासाठी असायला पाहिजेत..हा प्रश्न संबंधित नऊ गावच्या सरपंचाला विचारला तरी त्याचे उत्तर अनुत्तरीतच असेल…..
हि अवस्था या कृषि प्रधान भारतातील शेतक-यांची…
अॅग्रीस्टॅट ( फार्मर आय- डी ) प्रत्येक शेतक-यांनी काढुनी घ्यावा ..हा सरकारचा शक्तीचा नियम…पण त्यासाठी प्रत्येक गावाला कृषि विभाग महाराष्ट्र शासनाने गावपातळीवर कृषि सहायकांची नेमणुक केली आहे. तो कृषि सहायक गावातील ग्रामपंचायत दर्शनी फलकावर लिहिलेले असतांना गावच्या ग्रामपंचायत किंवा गावातील शेतक-यांना कधी, केंव्हा भेटतो हा यक्षप्रश्न आहे.
सवना ज. सज्जाला कृषी सहाय्यक यांनी गेल्या तिनं महिण्यापासुन भेटच दिली नाही…एवढेच नव्हेतर सवना ज. गावच्या संरपंच आणी ग्रामपंचायत सदस्याची भेट घेतली नाही. अश्या कृषि सहायकाला विभागिय कृषि सहसंचालक आणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी माननीय कळसाईत साहेबांनी तात्काळ निलंबित करावे…
हिमायतनगर तालुका कृषि अधिकारी मा. बांधेल यांनी तात्काल पत्र काढुन सवना ज. सज्जातील सर्व ग्रामपंचायतला कळवावे..अन्यथा आंदोलन करण्यात येईल..असा गर्भीत इशारा सवना, मादापुर, चिचोर्डी, रमणवाडी, एकघरी, वाशी, जिरोणा, दगडवाडी, गणेशवाडी, गणेशवाडी तांडा आदी गावातील शेतक-यांनी दिला आहे.