Home Breaking News क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त नांदेड येथे अभिवादन..

क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त नांदेड येथे अभिवादन..

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 11 एप्रिल 2025

महात्मा फुले हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते.

त्यांनी सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य केले.

त्यांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांचे काही प्रेरणादायी विचार आहेत, जसे की, विद्येविना मती गेली, मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले.

त्यांना फक्त त्रासच दिला असे नाही तर त्यांच्या हत्येचाही प्रयत्न झाला.

त्यांची जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.

यांच्या जयंतीनिमित्त सावता परिषद या सामजिक संघटनेच्या वतीने आय टी आय येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सावता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ राऊत, जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे,माजी सभापती लक्ष्मणराव जाधव, रामचंद्र रासे, सखाराम शितळे, सोनाजी राऊत, डॉ. लक्ष्मण शिंदे सर, डॉ. गाडगीळ, महानगराध्यक्ष बालाजी बनसोडे, जिल्हा प्रवक्ते मारोती शीतळे, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत राऊत, युवा महानगराध्यक्ष संदीप झांबरे, नांदेड तालुकाध्यक्ष बजरंग रासे, विशाल बोराटे, राजू मोरे, मारोती राऊत, संभाजी राऊत, साहेबराव सावंत, गोविंदराम शुरनर प्रा. लुटे सर यांच्या सह समाज बांधव व फुले प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleकु.गिता राजेश चिकनेपवाड हीची बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी साहाय्यक पदी निवड.
Next articleशेतकरी का मरतो आहे