मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 27 एप्रिल 2025
नांदेड जिल्हयातील हिमायतनगर तालुक्यात अवकाळी पावसामुळे हळद, ज्वारी, तिळ, आंबा आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बळीराजा वरील संकटाची मालीका अजुन सुरुच आहे. शेतक-यांचे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणारे नगदी पिक हळद पैसे देणारे पिक आहे. हळदी शिजवुन सुकविण्यासाठी टाकली असता.. अचानक शनिवारी रात्री झालेल्या पाऊस, वारा, वादळामुळे हळद उत्पादक शेतक-यांची खुपच फजिती झाली आहे. हळद या पिकाला शासनाने पिमाकवच देऊन शेतक-यांना सहकार्य करावे. अशी मागणी शेतकरी करीत आहेत.