कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
शेतकरी सध्या एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे हैराण होत आहेत. यंदा वेळेवर पेरणी झाली, पेरणी केल्यानंतर पाऊस नाही सोयाबीन उगवण समस्या झाली बुरशीचा प्रादुर्भाव झाला उगवण अडचणी आल्या, नंतर काही शेतकऱ्यांची सोयाबीन चांगले उगवण क्षमता झाली पण त्यात सुद्धा अनेक संकटात आली नीलगायी आणि हुमणी अळी यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटांमुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली असून, त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील सर्व गावात हि हुमणी अळी सुतकृमी यांच्या मुळे सोयाबीन पिकाचे प्लाट प्लाट चार दिवसांत सोयाबीन वाढ खुंटते व नंतर पिवळे पडत त्यानंतर काही दिवसांनी पिक वाळून जाते त्यांच्या मुळाशी खुप मोठ्या संख्येने हुमणी अळी यांचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे त्या मध्ये पळसपुर येथील शेतकरी सखाराम चांदराव वानखेडे यांचे २एकर तर गावातील अनेक शेतकऱ्यांची
१ते२ एकर शेत हुमणी अळीमुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. यांना प्रत्येक बॅगसाठी ३,००० रुपये याप्रमाणे एकूण ९,००० रुपये बियाणे व इतर खर्च झाले. याशिवाय पेरणी, तणनाशक फवारणी, बीजप्रक्रिया, हुमणी अळी नियंत्रणासाठी औषधे आणि खते इत्यादी चा खर्च मिळून त्यांना जवळपास २५,००० रुपये खर्च आला. हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे काही शेतकऱ्यांना शेतात रोटर फिरवावे लागणार आहे. अशी परिस्थिती सर्व तालुक्यातील गावांची झाली आहे या साठी कृषी विभागाने सुचवलेले मेटारायझियम औषध वापरूनही अळींचा प्रादुर्भाव रोखता आला नाही, परिणामी संपूर्ण पीक नष्ट झाले. त्यामुळे कृषी विभाग यांने शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करून हि यश आले नाही कमी पडत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
पण आता हुमणी अळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या मुळे नुकसानीचे पंचनामे करण्यात, यावे पण शासनाकडून अद्याप शेतकरी यांच्या हुमणी अळी सुतकृमी पाहण्याच्या तयारीत नाही हुमणी अळी चे नुकसान मुळे
हुमणी अळीमुळे अनेक शेतकऱ्यांना पिकांवर रोटर फिरवावे लागणार आहे, ज्यामुळे त्यांचा खर्च दुप्पट झाला असून, त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला आहे.
आता हुमणी अळीच्या संकटाने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे, जेणेकरून पुढील पेरणीसाठी त्यांना आर्थिक आधार मिळेल…
संकटांनी तालुक्यातील सर्व आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दुबार पेरणीमुळे त्यांचा खर्च वाढला असून, पुढील उत्पन्नाची कुठलीही शाश्वती नाही. हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे लवकरात लवकर नुकसानभरपाई आणि मदतीची मागणी केली आहे, जेणेकरून त्यांना या आर्थिक संकटातून सावरण्याची पुन्हा एकदा संधी मिळेल…


