सोमवार , दिनांक – १४ जुलै २०२५
हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्युज
मो. नंबर – 8983319070
होळकरवाडा (रंगमहाल) येथे सोमवार ( दि. १४ जुलै ) रोजी सुखदेव माध्य. व कनिष्ठ महाविद्यालय इंदिरानगर नाशिक येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रभेट दिली. यावेळी प्राचार्य दत्तात्रय बारगळ सर यांनी विद्यार्थ्यांना होळकर राजघराण्याचा व होळकरवाडा ( रंगमहाल ) चा इतिहासा विषयी व्याख्यान दिले.
” लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीचे प्रमुख प्राचार्य दत्तात्रय बारगळ यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारीत डॉ. वर्षा चौरे लिखित ” पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ” या चरित्र ग्रंथांचे उपस्थित ५० विद्यार्थ्यांना व मान्यवरांना वाटप करण्यात आले.”
यावेळी जेष्ठ नेते अशोक काका व्यवहारे सागर जगताप सर , अर्जुन ढगे , प्राचार्य दत्तात्रय बारगळ , योगिता भामरे , पिंटू राऊत , निलेश ढगे , बाळा पाडवी, व सुखदेव माध्य. व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.



