Home Breaking News तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांने वाचविले गाईंचे प्राण!

तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांने वाचविले गाईंचे प्राण!

मारोती अक्कलवाड पा.सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक-27 सप्टेंबर 2022

आपल्या कार्यसेवेत सतत तप्पर राहुन हिमायतनगर तालुक्यातील अनेक जनावरांचे प्राण वाचविणारे, कर्तव्यदक्ष पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनटक्के यांनी रात्रीची पर्वा न करता, मौजे रमणवाडी येथील सधन, आदर्श शेतकरी बळिराम विठोबा जाधव यांच्या गाईचे प्राण वाचविले आहे.
सधन शेतकरी जाधव यांच्या गाईचे पोटातच मयत झालेल्या वासरु यशस्वी शस्त्रक्रिया करुन सोनटक्के साहेब आणि त्यांचे कर्मचारी डॉ. सतिश बल्पेवाड यांच्या सहकार्याने जवळपास सतत दोन तास आॅपरेशन करुन एका मुख्या जनावरांचे प्राण वाचविले आहेत.
गेल्या काही अनेक दिवसांपासून तालुक्यातील गावोगावी शिबीरे घेऊन जनावरांना लंपी आजाराची प्रतिबंधात्मक लस देऊन, आपण सदैव शेतकऱ्यांना अडचणी सोडवितो हेच त्यांच्या कार्यातुन दिसून येते.
असेच शेतकरी बांधवांच्या हिताचे कार्य आणि सेवा तालुक्यातील ईतर अधिकारी व कर्मचारी यांनी करावी. अशी अपेक्षा बळीराम विठोबा जाधव, उपचेअरमन दिलीप आडे, उपसरपंच वसंत जाधव, संचालक प्रेमसिंग जाधव, संचालक तथा शिक्षक विजय जाधव, गुणाजी जाधव, भिमराव जाधव आदी रमणवाडी येथील शेतक-यांनी केली आहे.

Previous articleकृषी मंत्र्याचा परभणी जिल्ह्यावर दुजाभाव!
Next articleदरोडा करणा-या सराईत पाच गुन्हेगाराना ठोकल्या बेडया.