Home Breaking News नवनियुक्त जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ श्री.जगदीशजी बारदेवाड व शिवसेना तालुकाप्रमुख संजय काईतवाड...

नवनियुक्त जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ श्री.जगदीशजी बारदेवाड व शिवसेना तालुकाप्रमुख संजय काईतवाड यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक, नांदेड
दिनांक-15 जुलै 2025

हिमायतनगर – तालुक्याचे भुमिपुत्र डॉ.जगदिश लिंगन्ना बारदेवाड यांची नांदेड जिल्हा पुरवठा अधिकारी (DSO) पदी नियुक्ती झाल्याबद्दल यांचा व बोरगडी येथील माजी सरपंच संजयजी काईतवाड शिवसेना हिमायतनगर तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल या दोन्ही तरी हिमायतनगर तालुक्यातील शेकडो समाज बांधवांच्या उपस्थित गोल्ला गोलेवार यादव महासंघ हिमायतनगर तालुक्याच्या वतीने भव्यदिव्य सत्कार रविवारी सकाळी ठिक 11 वाजता, महात्मा फुले सभागृह हिमायतनगर येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाले.

डॉ.बारदेवाड साहेब बोलताना म्हणाले की, मी सदैव प्रयत्नशील आसतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले,अनेक संकटे माझ्यावर आली आहेत.परंतू माझी सर्वस्व असणारी माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होती, त्यामुळे मी अनेक संकटावर मात करून मी आज यशस्वी झालो आहे, आणि ह्या यशाचे सर्व श्रेय माझे दैवत असणारी माझी आई यांनाच जाते, माझ्या आईमुळे मी आज एका उच्च पदावर विराजमान झाले आहे.जगदिश बारदेवाड यांनी आपल्या स्वतःच्या आईला या ठिकाणी सर्वस्व मानले आहे.
पुढे बोलतांना म्हणाले की मी गेल्या 13 वर्ष गडचिरोली जिल्ह्यात नोकरी केली आहे त्यामुळे मला माझ्या समाजासाठी वेळ देता आले नाही हे माझ्या मनात खंत आहे पण यापुढे यादव समाजातील प्रत्येक समस्या माझ्या कार्यालयात अंतर्गत येणाऱ्या मी माझ्या परीने नक्कीच सोडण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले, यु वकांना मार्गदर्शन करतांना आपल्याला आलेल्या अपयशामुळे खचून न जाता त्यातून निरंतर प्रयत्न केल्यास नकीच येश मिळेल असे त्यांनी आवाहन केले आहे.

यावेळी जेष्ठ समाजसेवक दशरथ गोसलवाड, सुभाषराव शिल्लेवाड,शिवाजी बोटेवाड, कपिल करेवाड,अभिषेक बकेवाड,संटी कपलवाड,बाबाराव जरगेवाड,श्यामजी जक्कलवाड,राजेश चिकनेपवाड,प्रकाश भदेवाड,विठ्ठल गोपुवाड, दत्ता सेठ बलपेलवाड, बालाजी मॉकलवाड,गंगाधर बासेवाड, साईनाथ निम्मेवाड, लक्ष्मण भैरेवाड,सुरज चितलवाड, मधुकर मिरगुलवाड, राजु पोटेवाड,योगेश मंत्रे, बालाजी बकेवाड,यांच्या सह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

Previous articleचांदवडला होळकरवाडा ( रंगमहाल ) येथे सुखदेव माध्य. व कनिष्ठ महाविद्यालय इंदिरानगर नाशिक च्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट…
Next articleमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम संपन्न..