जिल्हा संपादक नांदेड दिनांक-04 /09/2025
ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांवर गदा आणणाऱ्या शासन निर्णयाच्या विरोधात हिमायतनगर येथील ओबीसी समाजाच्या वतीने आज दि 4 सप्टेंबर रोजी हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सरकारच्या जी.आर.ची होळी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिमायतनगर तहसीलदार यांच्यामार्फत एक लेखी निवेदन देण्यात आले
महाराष्ट्र सरकारकडून मराठा आरक्षणाच्या संदर्भात काढण्यात आलेल्या जी. आर. मुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या हक्कांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला. विशेषतः हैदराबाद गॅजेट ओबीसीमध्ये समाविष्ट केल्याने स्थानिक ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष केल्याचा सूर ओ बी.सी बांधवांकडून व्यक्त झाला. या आंदोलनादरम्यान ओ.बी.सी.बांधवांनी आज तहसील परिसरात जोरदार घोषणाबाजी करत शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत हा जीआर तात्काळ रद्द करावा अन्यथा महाराष्ट्रभर सकल ओबीसी समाज तीव्र आंदोलन छडील असा इशारा एका लेखी निवेदनाद्वारे नगर तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला या नियोजनात असे नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्रातील प्रस्थापित मराठा समाज हा जमीनदार कारखानदार आर्थिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात पुढारलेला व गर्भ श्रीमंत असा समाज आहे हा समाज ओबीसीचे आरक्षण बळकवण्यासाठी मनोज दरांगे पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात आंदोलन चढून सरकारला व ओबीसी समाजाला विटेस गरज आहे त्यामुळे ओबीसी समाजाला घटनेने संविधानाकरिता मिळालेल्या आरक्षणाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या निर्णयाविषयी काढलेला जीआर माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ रद्द करावा अन्यथा नाईलाजाने सकल ओबीसी समाज बांधव महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन छेडल अशा तीव्र भावना व्यक्त करत आज शासनाच्या जीआरची होळी करत सकल ओबीसी समाज बांधव आक्रमक
यावेळी ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता..



