Home Breaking News शेतक-यांना शासनाच्या मदतीची अपेक्षा…मुसळधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान..

शेतक-यांना शासनाच्या मदतीची अपेक्षा…मुसळधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान..

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 18 सप्टेंबर 2025

नांदेड जिल्हयातील आॅगस्ट -सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने प्रचंड खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र शासनाने आजतागायत हेक्टरी नुकसान भरपाई जाहीर केली नाही. त्यामुळे सरकारविषयी शेतक-यांमध्ये प्रचंड रोष आहे.

यावर्षी पाऊस अनिश्चित स्वरुपाचा पडत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी पावसात पडणारा खंड त्यामुळे यंदाचे खरीप हंगामातील पिकाची परिस्थीती नाजुक होत आहे.त्यामध्ये सप्टेंबरमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाल्याने होते तेही पिक शेतक-यांच्या हातचे गेले आहे. त्यामुळे शेतक-यांना हेक्टरी 50,000 हजार प्रति हेक्टर मदत सरकारने द्यावी असे निवेदन तहसील कार्यालय येथे निवेदने देऊनही शासनाने अजुनतरी कोणतीही हेक्टरी मदत जाहीर केली नाही. त्यामुळे शेतकरी हतबल होत आहे. लवकरात लवकर आर्थिक मदत देऊन शेतक-यांना मदत द्यावी.अशी मागणी होत आहे.

Previous articleआर्थिक राष्ट्रवादाच्या समन्वया अभावि निर्माण होणारा सामाजिक आर्थिक असमतोल.
Next articleवाढोणा येथे माता कालिंका देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची पर्वणी