Home Breaking News नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या शनिवारी २७ सप्टेंबर रोजी कमी दाबाचे...

नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या शनिवारी २७ सप्टेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले़.

अति मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार सुट्टी जाहीर

कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर दिनांक २७/०९/२०२५

हिमायतनगर. नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना मुंबई हवामान शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना दिनांक २७ सप्टेंबर रोज शनिवार रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय, खाजगी शिकवणी तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना शनिवार २७सप्टेंबर २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे याबाबतचा आदेश नांदेड चे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी आज निर्गमीत केला आहे.

मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या पूर्व सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यास शनिवार २७ सप्टेंबर २०२५ रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आदेशामध्ये असे म्हटले आहे की जिल्ह्यातील पूर्ण सिंचन प्रकल्प पूर्णपणे भरले असून त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा किंवा वरून पडणाऱ्या पावसाचे पाणी जास्त होत असल्याने सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्णपणे भरलेले असून सर्व नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग चालू आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी इशारा पातळी गाठलेली असल्याने नांदेड जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

नांदेड जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक महाविद्यालय) मधील विद्यार्थ्यांना शनिवार २७ सप्टेंबर२०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी काढले आहे..

Previous articleत्र्यंबकेश्वर येथील पत्रकारावरील हल्ल्याचा महाराष्ट्रभरातून निषेध
Next articleदुर्देव! हिमायतनगर तालुक्यांच…खरीप पुर्ण गेलं… बोरगडी येथे वीज पडून वासरू ठार..