संदिप देवचे ग्रामीण पत्रकार 9860426674
जलंब (प्रतिनिधी) – ‘सेवा पंधरवाडा’ या अभियानाच्या अनुषंगाने भव्य आरोग्य तपासणी शिबिर मारूती सस्थान जलंब येथे पार पडले. या शिबिरात.डॉ.पांडुरंग हटकर.स्रीरोग तज्ञ डॉ मणिषा हटकर बालरोग तज्ञ डॉ.शितल चव्हान जनरल फिजिशयन डॉ.चेतन साटोटे अस्थिरोग तज्ञ डॉ समृद्धी मेंढे जनरल सर्जन तज्ञ डॉ प्रतिक सुरसे नैत्ररोग तज्ञ यांच्यासह वैद्यकीय पथकाने ग्रामीण भागातील जवळपास 450 नागरिकांनी व महीला आरोग्य तपासणी केली.
कार्यक्रमाचे उद्घाटक .महाराष्ट्र राज्याचे कामगार.मंत्री आकाश दादा फुंडकर यांच्या हस्ते झाले होते. या वेळी उपस्थितांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात रक्तदाब, हिमोग्लोबिन, मधुमेह, नेत्र तपासणी यांसह विविध चाचण्या घेण्यात आल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी योग्य उपचार, संतुलित आहार, व्यायाम व स्वच्छतेचे महत्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
“यावेळी का.मंत्री आकाश दादा फु़डकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की –
“आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. सशक्त नारी आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारल्यास उज्ज्वल भविष्य घडते.
आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. सुदृढ राहिल्याशिवाय कोणतेही ध्येय साध्य होऊ शकत नाही. सशक्त नारी हीच उज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्यावी, कारण निरोगी शरीरातच निरोगी विचार आणि सामर्थ्य निर्माण होते.”
या कार्यक्रमाला माननीय नामदार महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री आकाश दादा फुंडकर जिल्हा सरचिटणीस आदरणीय श्री शरद चंद्र गायकी डॉ एकनाथ पाटील पांडुरंग शेजोळे प्रमोद वळोदे दत्ता जवळकार सुरेश भाऊ वनारे राजू भाऊ देवचे दिलीपभाऊ शेजोळे ऊत्तमभाऊ घोपे भैयासाहेब देशमुख महादेव मिरगे शामभाऊ चोपडे सुरेश खेळकर दादा मोहे श्रीकुष्ण भागवत अतुल देवचे संतोष देशमुख विजुभाऊ भलतीलक राजू भाऊ ढोले राजू भाऊ हेलगे संतोष भाऊ चोखंडे राहुल लाड मनीष सडतकार सागर बोळे सुधीर भाऊ खवले धोंडू घेंगे सुरेश सोनट्टके पंकज मंडवाले बबलु देशमुख संदिप देवचे सुरज देशमुख सचिन असंबे अविनाश घोपे दिपक चोपडे विकास देवचे गणेश काकड गणेश लागे बाकी सर्व जळंब चे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते गावकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार अमोल काळे सर यांनी केले.
या आरोग्य शिबिरामुळे नागरिकांनमधे आरोग्याविषयी जनजागृती झाली असून उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला



