सुरेश रा.सिरसाट अकोला ===============================स्टेज समितीच्या उपस्थितीत स्टेज उभारणीला सुरूवात ===============================
अकोला दि.28 सप्टें : दरवर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मा अॅडो बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली अकोल्यात ऐतिहासिक धम्म मेळावा साजरा होत असतो.या धम्म मेळाव्याला 40 वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. दि.3 ऑक्टोबर 2025 ला होऊ घातलेला अकोल्यातील धम्म मेळावा यावर्षी सुद्धा क्रिकेट क्लब मैदानावर साजरा होणार आहे.
स्टेज समितीच्या उपस्थितीत आज प्रत्यक्ष स्टेज उभारणीला क्रिकेट क्लब मैदानावर सुरू झाली आहे. 80 × 30 फूट व 10 फूट उंचीचा अतिभव्य स्टेज यावर्षी सुध्दा असणार आहे.स्टेज/ विचारपीठ अतिभव्य व आकर्षक असणार आहे.
आज सकाळी 11.0 वा धम्ममंच (स्टेज) समितीचे प्रमुख व सर्व सदस्य मैदानावर हजर होते. यामध्ये धम्ममंंच समिती प्रमुख आनंद डोंगरे, सुरेश रा शिरसाट, सिध्दार्थ शिरसाट, विकास सदांशिव, सुरेंद्र तेलगोटे , प्रदिप शिरसाट, बुध्दरत्न इंगोले, राजाभाऊ लबडे, भिमराव खंडारे, प्रा. शैलेश सोनोने, प्रकाश बागडे, हितेश जामणिक, सिध्दार्थ उगले मेजर, सचिन शिरसाट, रूपेश जंजाळ, सुनिल सरदार, दिपक सावंग, सेवानंद इंगळे, शुक्लोधन वानखडे, वर्षाताई हिवराळे, प्रणालीताई वानखडे, शुक्लोधन डोंगरे, जयराज चक्रनारायण इ उपस्थितीत होते.



