Home Breaking News पाचोऱ्याचे आ. किशोर पाटील यांच्यावर कारवाई करावी:- खामगाव प्रेस क्लबचे निवेदन…

पाचोऱ्याचे आ. किशोर पाटील यांच्यावर कारवाई करावी:- खामगाव प्रेस क्लबचे निवेदन…

पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालवावे.

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी

खामगाव:- खामगाव प्रेस क्लब व पत्रकार बांधवांच्या वतीने आज १७ ऑगस्ट २३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकारी (महसुल) यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. त्यामध्ये अशा आशयाचे नमुद केले आहे की, महाराष्ट्रात ८ नोव्हेंबर २०१५ पासुन पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे. परंतु अमलबजावणी होत नसल्याने कुचकामी ठरत आहे. राज्यात गेल्या ४ वर्षात जवळपास २०० पत्रकारांवर हल्ले झाले किंवा शिवीगाळ व धमक्या देण्यात आल्या. मात्र केवळ ३७ प्रकरणातील गुन्ह्यात संरक्षण कायदा लागू केला आहे आणि त्यातील एकाही प्रकरणातील आरोपीला शिक्षा झाली नसल्याने कायद्याचे संरक्षण पत्रकारांना उपयुक्त ठरले नाही. त्यामुळे या कायद्याची मितीच समाजकंटकांच्या मनात उरली नसल्याने राज्यात पुन्हा मोठ्या संख्येने पत्रकारांवरील हल्ले वाढले आहे. अलिकडेव पाचोरा येथील एका पत्रकारास आ. किशोर पाटील यांनी शिवीगाळ केली तसेच गुडाकरवी त्यांच्यावर हल्ला चढविला. याप्रकरणी आ. किशोर पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला नाही. सरकारकडे दोन मागण्या आहेत. पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर पत्रकार सरंक्षण कायद्याचे कलम लावायला पोलिस टाळाटाळ करत असतील तर संबंधीत अधिकान्यावर कारवाई व्हावी तसेच पत्रकारावरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालविण्यात यावे, जेणेकरून पत्रकारांना न्याय मिळू शकेल असे निवेदनात नमुद केले आहे. निवेदनावर अध्यक्ष किशोर आप्पा भोसले, नितेश मानकर, मोहम्मद फारूक, कुणाल देशपांडे, नितिन इंगळे, संभाजीराव टाले, से. अकबर, चंद्रमान मुंडीवाले,विनोद भोकरे, गजानन राऊत, गणेश पानझाडे, मोहन हिवाळे, आकाश शिंदे, सचिन बोहरपी, अनुप गवळी, श्रीधर ढगे, अशोक जसवानी, शरद देशमुख, सुधीर टिकार, संतोष करे, धनंजय वाजपे, विनायक देशमुख, रूपेश कलंत्री, मनोज नगरनाईक, विकास कुळकर्णी, मुबारकखान पंकज गमे, माना हिवराळे, मोनु शर्मा, महेंद्र बनसोड, राहुल खंडारे, अमोल गावड, शिवाजी भोसले, पंकज यादव, सिध्दांत उंबरकार, सुमीत पवार, प्रशांत देशमुख. सतिष आप्पा दुडे, किरण मोरे, शे. सलिम फरीद, आशिष पवार, सुरज गावंडे, सत्येंद्रसिंह ठाकुर, पांडूरंग काळे, शांताराम तायडे, अनिल खोडके, एम.आर. इंगळे, अजयसिंह राजपुत, नागोराव अहिरकर, उमेश मोरखडे आदी पत्रकार बांधवांच्या सह्या आहेत

Previous articleश्रीक्षेत्र बोरगडी येथे पुरुषोत्तम अधिक मास निमीत्त अखंड श्रीराम नाम जपाची सांगता…*
Next articleमॅडम झेंडावंदनाला नाही आल्या? अकोल्यात महिला पोलिसाचा गळफास, चिठ्ठीतून आत्महत्येचं कारण उलगडलं