Home Breaking News खेट्री येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संघाची वार्षिक सभा संपन्न

खेट्री येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संघाची वार्षिक सभा संपन्न

नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधी

पिंपळ खुटा : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा पातुर च्या वतीने वार्षिक सभेचे आयोजन.पातुर तालुक्यातील खेट्री येथे निसर्गरम्य परिसरात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पातुर तालुका अध्यक्ष शेख खुद्दुस हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अकोला जिल्हा सदस्य पत्रकार उमेश देशमुख,प्रदीप काळपांडे,माजी.तालुकाध्यक्ष मोहन जोशी, किरण निमकंडे,तालुका सचिव संगीता इंगळे,प्रमोद कढोणे,यांची उपस्थिती होती.वरील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण चे पत्रकार तालुका उपाध्यक्ष नासिर शेख,सह ग्रामीण भागातील मराठी पत्रकार परिषद संघाचे सर्व सदस्य यांनी केले होते.या सभेमध्ये पत्रकारांना घरकुल योजना,पेन्शन योजना,चालू करण्यात याव्या व पातुर येथे पत्रकार भवना करिता निधी उपलब्ध करून घेण्याकरिता पाठपुरावा करण्याचा ठराव पारित करण्यात आला.ठरावा मध्ये सर्व पत्रकार बांधवांनी अनुमती दर्शविली.या वार्षिक सभेमध्ये वार्षिक वर्गणी जमा करणाऱ्या पत्रकारांना पावत्या वितरित करण्यात आल्या. यावेळी सभेनंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाला ग्रामीण भागातील मराठी पत्रकार परिषद संघाचे सदस्य पत्रकार नासिर शेख,योगेश नागोलकर, राठोड ,राहुल देशमुख,अमोल सोनोने,राजू राऊत,गोपाल राठोड,श्रीकृष्ण लखाडे, नासीर शाह, शोयबोद्दिन,विजय सरदार,शेख साजीद सह मराठी पत्रकार परिषद शाखा पातुर ग्रामीण भागातील पत्रकार उपस्थित होते.

Previous articleममदापूर सोसायटी निवडणूकीत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय!
Next articleलॉयन्स क्लब संस्कृतीच्या वतीने शासकीय रुग्णालयाच्या परिसरात गरजुंना अन्नदान वाटप.