Home समाजकारण लॉयन्स क्लब संस्कृतीच्या वतीने शासकीय रुग्णालयाच्या परिसरात गरजुंना अन्नदान वाटप.

लॉयन्स क्लब संस्कृतीच्या वतीने शासकीय रुग्णालयाच्या परिसरात गरजुंना अन्नदान वाटप.

अजयसिंह राजपूत
तालुका प्रतिनिधी

शासकिय रुग्णालयात मोफत अन्नदान’    खामगाव:-लाॅयन्स क्लब संस्कृती खामगावच्या वतीने शासकीय रुग्णालयाच्या आवारात अन्न वाटप केंद्रावर दररोज गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना लॉयन्स क्लब संस्कृती अन्नसेवा या प्रकल्पाअंतर्गत रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज अन्नदान वाटप करण्यात येते.
अनेकांनी यात सहभागी व्हावे रुग्णालय परिसरातील दोनशेहून अधिक गरजूनी या अन्नदानाचा लाभ घेतला जातो. यावेळी लॉयन्स क्लब संस्कृती सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सदस्यांचे अभिनंदन करून जास्तीत जास्त सदस्यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी या प्रसंगाच्या अनुषंगाने रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांची निकडीची गरज लक्षात घेऊन जास्तीत जास्त सदस्यांनी सहभाग घ्यावा व लॉयन्स क्लब संस्कृती अन्नसेवा संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेला उपक्रम दैनंदिन व सातत्याने सुरु राहण्यास मदत होईल. याचा प्रयत्न करावा.

Previous articleखेट्री येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संघाची वार्षिक सभा संपन्न
Next articleआमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांची काम करण्याची कार्यशैलीच वेगळीच!