Home राजकारण आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांची काम करण्याची कार्यशैलीच वेगळीच!

आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांची काम करण्याची कार्यशैलीच वेगळीच!

👉 कॅबिनेट पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा..

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक-3 जुन 2022

राजकारण असो, समाजकारण असो, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा मतदार संघातील विकासात्मक कामे असो, वैयक्तिक जनतेच्या अडीअडचणी असो, शालेय, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, बांधकाम आदि विषयांवर अत्यंत इंतभुत माहिती घेऊन राज्याच्या मंत्रीमंडळात प्रत्येक कामाचा लेखाजोखा मांडणारे, हदगांव-हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांचे नांव सदैव चर्चेत आहे.
आज महाराष्ट्र राज्यांचे विद्यमान , लोकप्रिय मुख्यमंत्री यांचे पुत्र तथा राज्याचे कॅबिनेट पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन, आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर साहेबांनी शुभेच्छा दिल्या. सोबतच हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव ग्रामपंचायत कार्यालयाने ” माझी वसुंधरा” या उपक्रमाची माहिती देऊन, पुन्हा एकदा आपल्या कामाची चुनुक दाखवायला आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर साहेब हेच लोकप्रिय आणि हदगाव – हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यां जनतेचा बुलंद आवाज म्हणुन सर्वदूर परीचित असलेले, राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांचे विश्वासू आहेत, हे पुन्हा सिद्ध झाले.

👉 मुंबईत कामानिमित्ताने कायम दबदबा निर्माण करणारा नेता.

हदगाव हिमायतनगर तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर साहेब नेहमीच तत्पर असतात. अशी चर्चा दोन्ही तालुक्यात चालू आहे.

Previous articleलॉयन्स क्लब संस्कृतीच्या वतीने शासकीय रुग्णालयाच्या परिसरात गरजुंना अन्नदान वाटप.
Next articleमृग नक्षत्राने मारली दडी, पावसाळा लांबला,शेतकरी चिंतातूर!