Home Breaking News लग्नसराई संपली… शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त!

लग्नसराई संपली… शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त!

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 08 में 2024

संबंध नांदेड जिल्ह्यात उष्णतेची लाट असतांना यावर्षी लग्नसराईचा हंगाम चांगलाच होता. उन्हाळी हंगामातील शेवटचा में महिना चालू आहे. या महिन्यात लग्न बोटावर मोजता येतील एवढेच एक ते दोनच आहेत. एक महिन्यानंतर खरीप हंगामातील मृग नक्षत्र सुरू होईल. त्यासाठी उन्हाची पर्वा न करता शेतकरीराजा आपल्या काळया आईची पेरणीपूर्व मशागतीची कामे करत आहेत. तब्बल 42° ते 43° डिग्री तापमानात शेतीची मशागत करतांना बहुतांश शेतकरी व्यस्त आहेत. त्यातच अवकाळी पाऊस पडत असल्याने काही ठिकाणी वातावरणात थंडावा निर्माण होत आहे. पण जिव ओतुन आपल्या सर्जा – राजासोबत बळीराजा ऐन उन्हात ओतचे काम करत आहे. 16 में पासुन बाजारात कपाशीचे नविन बियाणे बाजारात उपलब्ध होत आहे. खतांच्या किंमती जेसे तेच राहणार असून शेतकऱ्यांनी वाढत्या किंमती बाबत चिंता करण्याचे कारण नाही. असे कृषि विभागाने स्पष्ट केले आहे.

Previous articleकृषी विभागामार्फत खरीप पुर्व हंगाम सभा संपन्न .
Next articleअस्ष्ठपैलु नैतृत्व असणारे, “प्रकाश यशवंत आंबेडकर” उपाख्य बाळासाहेब आंबेडकर 10 मे स्वाभिमान दिवस, आणी वाढदिवसाच्या शुभेच्छा.