Home समाजकारण बाळापुर येथे संविधान सन्मान दिवस संपन्न

बाळापुर येथे संविधान सन्मान दिवस संपन्न

बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती बोध्द विहार बाळापूर येथे संपन्न 

कार्यालयीन प्रतिनिधी : भारतातील सर्व संविधान वादी,लोकशाहीवादी स्वातंत्र्य दिवस आला आणि प्रजासत्ताक दिवस आला की प्रत्येक भारतीयांना आम्ही भारताचे लोक आहोत याचं स्मरण होते व भारत माझा देश आहे ज्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला कुठलाही भेदभाव न करता….स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्यायाची हमी दिली.

अश्या संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ला आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.

भारतीय राज्यघटनेत सध्या ४४८ कलमे आहेत, तर मूळ राज्यघटनेत ३९५ कलमे होती. ही कलमे २२ भागांमध्ये आणि १२ अनुसूचींमध्ये विभागलेली आहेत.अश्याप्रकारच्या मुद्द्यावर बैठकीत प्रकाश टाकण्यात आला,

बैठक यशस्वी करण्यासाठी सिध्दार्थ वानखडे,(भारिप माजी तालुकाध्यक्ष) बाळापूर अशोकराव उमाळे,नाजुकराव उमाळे (माजी सैनिक )संजय उमाळे वंचीत बहुजन कार्यकर्ते देवानंद इंगळे, उमाळे, शेषराव उमाळे( टेलर )जितेंद्र उमाळे,  श्रीकृष्ण तेलगोटे,राम डोंगरे, प्रकाश खनसरे,देवीदास म्हात्रे,अमोल हिवराळे डॉ शरद उमाळे धनराज इंगळे, गजानन वानखेडे, रामपाल तायडे, दादाराव वाकोडे,सुनिल पाचपोर, विष्णु बावणे,आदि

कार्यक्रमाला विविध जातींचे शेकडो संविधान प्रेमी उपस्थित होते.
Previous articleभारतीय जनता पार्टी महानगर ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी बैठक व पदाधिकारी नियुक्तपत्र प्रदान कार्यक्रम उत्साहात संपन्न
Next articleमार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी काटेकोरपणे केल्यास गरीबी, बेरोजगारी कुपोषण शेतकरी आत्महत्या यासारख्या समस्यावर कायमस्वरूपी उपाय साधता येईल