Home Breaking News

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

मुख्याध्यापकांची पेन्शनकेस सह सर्व कागदपत्रांवर सह्या करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला द्यावा .एस बी देशमुख सचिव -नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ_*


नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच संस्थेत संस्थाअंतर्गत वाद असल्यामुळे मुख्याध्यापकांची पेन्शन केस , रजा रोखीकरण, मेडीकल बीले ,सेवापुस्तक यावर संस्थाचालक सह्या करत नाही . आर्थिक मागणी करून अडवणुक करतात. अशा अनेक तक्रारी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाकडे आल्या आहेत . तेव्हा मुख्याध्यापकांच्या सर्व कागद पत्रांवर सह्यांचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला द्यावे अशी मागणी मुख्याध्यापक संघाने शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडे* *मेलद्वारे केली आहे . नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस के सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व्ही एन नाईक शिक्षण संस्था डोंगरे वसतीगृह नाशिक येथे सहविचार सभा संपन्न झाली या वेळी प्रास्ताविक सघाचे उपाध्यक्ष प्रदिप सांगळे यांनी केले .या वेळी शिक्षणाधिकारी कार्यालयातील प्रलंबीत प्रश्न, जन्मतारिख, जात ,नाव बदल हे प्रस्ताव ८ दिवसांच्या आतच निकाली काढावे . D .Ed . टु B .Ed . प्रस्ताव ,पेन्शन केस, न्यायालयीन प्रकरणे हे प्रश्न त्वरित मार्गी लावावेत पे युनिट मधील प्रश्न फरक बीले, त्रुटी असलेले फरक बीले त्वरित द्यावी, टपाल घेण्याची व्यवस्था व मागील आवक बारनिशीची पडताळणी करावी पेन्डिंग बीले प्रतिक्षा यादी प्रमाणे मंजुर करावी .मुख्याध्यापकांना सन्मानाची वागणुक द्यावी ,* *शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शालार्थ आय डी संच मान्यता दुरुस्ती नवीन वर्ग व तुकडी मान्यता सेमी इंग्रजीचे प्रस्ताव त्वरित निकाली काढावे . मुख्याध्यापकांना अशैक्षणिक/ निवडणूक कामे देवु नये . सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचे पद सेवानिवृत्ती नंतर मुख्याध्यापक संघातून आपोआप रद्द होईल व त्या जागेवर नविन नियुक्ती केली जाईल प्रत्येक तालुक्यातुन २० नविन आजीव सभासद व शहरातून ५o सभासद रितसर करून त्यांची आजिव सभासद म्हणुन नोंद करून प्रत्येक तालुका प्रतिनिधींना मुख्याध्यापक संघात स्थान द्यावे या विषयावर महत्वपूर्ण वादळी चर्चा झाली या वेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष -एस के सावंत,सचिव एस बी देशमुख, उपाध्यक्ष प्रदीप सांगळे, ए.के कदम, बी डी गांगुर्डे, डी .के .गायकवाड, ए एल घोडेराव , डी .जी . रणधीर, डी एस व्याळीज , डॉ . अनिल माळी , एम डी काळे, मनोज वाकचौरे, बी ए खरोटे , के डी देवढे, सांगळे वी पी,घोलप सर,बी के नागरे,भागीनाथ घोटेकर, आर .टी . जाधव, अनिल देवरे, बी के शेवाळे ,

Previous articleमहादेवराव मिरगे यांची भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती
Next articleतुम्ही जन्मले नसते तर !