Home Breaking News सरसकट कर्जमाफी व तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावे…

सरसकट कर्जमाफी व तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावे…

👉 *शेतक-यांची मागणी*

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 08/10/2025

यावर्षी खरीप हंगामात प्रचंड अतिवृष्टी होऊन शेतक-यांच्या पिक, जमिनी, विहीर, पशुधन, फळबागा आदींचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. यासाठी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने, हिंगोली लोकसभेचे विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख प्रताप देशमुख यांच्या वतीने, नायब तहसीलदार मुंगाजी काकडे यांना दिलेल्या लेखी निवेदन दिले आहे.

मराठवाड्यातील भीषण ओला दुष्काळ लक्षात घेता, काळजी शासनाने जी मदत जाहीर केली, त्या मदतीमध्ये स्पष्टता दिसून येत नसून, ही शेतकऱ्याची शुद्ध फसवणूक आहे.
या आसमानी संकटामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन देशोधडीला लागला आहे. शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या तुटपूजा मदतीमुळे शेतकऱ्याची झालेली झीज भरून निघणार नाही.शासनाच्या वतीने तात्काळ कुठलाही निकष न लावता सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदत व सरसकट कर्जमाफी तात्काळ देण्यात यावी, अन्यथा शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे नायब तहसीलदार मुंगाजी काकडे यांना दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनावर जिल्हा संघटक सुभाषराव जाधव, तालुकाप्रमुख प्रतापराव देशमुख, माजी तालुकाप्रमुख शामराव चव्हाण, युवा सेना तालुका प्रमुख अमोल पाटील रुईकर, आशिष पाटील देवसरकर, बबनराव जाधव, अमोल पाटील कदम, गजानन पाटील धानोरकर, नारायणराव तावडे, सचिन पाटील चव्हाण, पंजाबराव देशमुख, बाबुराव कदम कोहळीकर, रामदास पतंगे, बाळु पाटील सप्तिकर, शंकराव कदम पळसपुरकर, लक्ष्मण शिंदे धानोरकर, नारायणराव तावडे तळणीकर, पुंजाराम कीर्तीवाड धानोरकर,पांडुरंग अडकिने येळमकर, नामदेव बद्देवाड नावेकर,आधीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous articleखासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतले कालींका मातेचे दर्शन..
Next articleजलंब येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न