Home Breaking News अतिवृष्टीने शेतक-यांचे स्वप्न मातीत मिसळली…सरकारने घोर निराशा केली

अतिवृष्टीने शेतक-यांचे स्वप्न मातीत मिसळली…सरकारने घोर निराशा केली

👉 थेट बांधावरुन

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 30 आॅक्टोबर 2025

यंदाचा खरीप हंगाम शेतक-यांसाठी काळा खरीप हंगाम म्हटला तर वावगं ठरणार नाही….अतिप्रचंड अतिवृष्टीने शेतक-यांची पिके गेली…मुग, उडीद, सोयाबिन,हळद आणी आजपर्यंत पडत असलेल्या पावसाने कपाशीचे पिकही मातीत मिसळले…परंतु अद्याप राज्यसरकारने शेतक-यांना करावी तशी भरघोस मदत दिली नाही…नुसत्याच पोकळ घोषणांचा पाऊस पाडला गेला…

बेरोजगार युवक वडीलोपार्जीत शेती करु पाहत असतांनाच..यावर्षीच्या अतिवृष्टीने पावसामुळे पिकासहित शेतातील तिस सेंटीमिटरचा काळाथर वाहुन गेला….असे अतिप्रचंड नुकसान यावर्षी शेतक-यांचे झाले आहे…परंतु सरकारने दिवाळीपुर्वी मदत देऊ असे आश्वासन हवेतच विरले आहे…शेतक-यांची कर्जमुक्ती हि निवडणुकीपुर्वी दिलेली गोड चाॅकलेट समितीच्या अभ्यासात गटांगळ्या खात आहे…राज्य सरकारच्या संकल्पपत्रात शेती पिकांना मिळणारा हमीभावाची आठवण तरी आजरोजी सरकारला शेतकरी नागपुर येथील आंदोलनातुन करून देत आहेत….याचाही सरकारला विसर पडला आहे…सोयाबिन…दोन-तिनं हजार रुपये प्रतिक्विंटलने विकत आहे…कपाशी अजुन शेतक-यांच्या शेतात पावसात भिजत आहे….शेतक-यांच्या मुलामुलीचे शिक्षण, आरोग्य, शेतीसाठी लागणारा खर्च, सावकारांचे कर्ज, उपवर मुला, मुलींचे लग्न कसे करावे…याच विंवचनेत शेतकरी लहरी निसर्ग आणी राज्यसरकारच्या चुकींच्या व्यवस्थेमुळे आत्महत्या करण्यापुर्वी शेतक-यांची मते घेतलेल्या महायुती सरकारने शेतक-यांना आर्थिक मदत देऊन कृषिप्रधान देशातील बळीराजा वाचविला तर बरं…होईल….

Previous articleदिपावलीच्या शुभमुहुर्तावर मौजे सवना येथे काकडा आरतीला प्रारंभ…
Next articleबाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी