मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 08 डिसेंबर 2025
हिमायतनगर तालुक्यातील काही गावातील शेतामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने शेतक-यांना आपला जिव मुठीत धरुन शेतात काम करावे लागत आहे. सवना ज., रमणवाडी, एकघरी, चिचोर्डी , पार्डी, वाशी, वडगांव, वारंगटाकळी आदी गावातील शेतामध्ये बिबटयाचे दर्शंन शेतक-यांना झाले आहे. हळद, ऊस, ज्वारी, गव्हु, हरभरा, मका आदी पिकांना रात्रीबेरात्री शेतकरी पाणी देताना जात असल्याने, बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी कमालीचे परेशान होत आहेत. दाखविले…बिबट्याच्या भितीने शेती नाही करावे तर…शेती केल्याशिवाय संसाराचा गाडा कसा हाकणार..असे काही शेतक-यांनी बोलुन दाखविले…वडगांव येथील एका शेतक-यांवर नुकताच बिबटयाने हल्ला करण्याच्या बेतात असतांना बैल उधळ्याने सुदैवाने तो शेतकरी बालबाल बचावला..
महाराष्ट्र शासन वनविभागाने या शेतात वावरणा-या बिबट्याचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर तालुक्यातील शेतकरी मोठे आंदोलन करणार असल्याचे जाणकार शेतक-यांनी बोलुन दाखविले आहे…



