*शहर प्रतिनिधी उमेश मोरखडे* *9405277639*
दिनांक : 25/12/2025
घाटपुरी नाका परिसरातील सरस्वती माता मंदिराजवळील ज्ञान व संस्कार यांचे ज्योतक असणारी आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज खामगाव शाळेची इयत्ता नर्सरी ते केजी टू च्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 25 /12/ 2015 रोजी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले.
शैक्षणिक सहलीची सुरुवात पारंपारिक वर्ष परंपरेनुसार कविश्वरसिंह राजपूत, प्रियंका राजपूत तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका,पर्यवेक्षिका व ज्येष्ठ शिक्षिका यांच्या हस्ते सहलीच्या बसेस चे पूजन, औक्षण तसेच माँ शारदेचा आशीर्वाद घेऊन करण्यात आली. सर्व विद्यार्थी प्रवासाचा आनंद घेत निघाले. सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी औद्योगिक क्षेत्र म्हणून खामगाव नगरीत नावरूप प्राप्त असलेल्या पारले- जी कंपनी तसेच भय्यूजी आश्रमास भेट दिली.
या भेटीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निरीक्षणातून विविध शैक्षणिक माहिती मिळाली तज्ञांनी विद्यार्थ्यांना पारले- जी बिस्कीट कसे बनते हे प्रात्यक्षिक स्वरूपात तसेच प्रोजेक्टवर दाखविले त्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढण्यास तसेच विषयाची गोडी निर्माण होण्यास मदत झाली तिथे मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.
एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्वरूपात संस्काराची जोड म्हणून भय्यूजी आश्रमात त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यासाठी नेण्यात आले त्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात अनेक उत्तेजनवर्धक, उत्साहावर्धक, मनोरंजनवर्धक खेळ खेळविण्यात आले. तिथेच विद्यार्थ्यांना शाळेतर्फे खाऊ वाटप करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांचा फक्त शैक्षणिकच विकास नव्हे तर संस्कारमय बौद्धिक, शारीरिक व शैक्षणिक विकास व्हावा हा आदर्श शाळेच्या ( शिक्षण इंग्रजीतून, संस्कार मातृभाषेतून ) या ब्रीदवाक्यप्रमाने संस्कारमय स्वरूपात करण्यात आला.
सहल दरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सूचनेचे काटेकोर पालन करत शिस्त पाळली तसेच सर्व पालकांनीही सर्व सूचनेचे पालन करून मोलाचा प्रतिसाद दिला.
ही सहल शाळेच्या संस्थेचे सदस्य कवीश्वरसिंह राजपूत सर, मुख्याध्यापिका सौ पळसकर मॅडम,पर्यवेक्षिका,ज्येष्ठ शिक्षिका व शिक्षक वृंद तसेच इतर कर्मचारी वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. या सहलीमुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढले तसेच सहकार्य, निरीक्षण शक्ती व शिस्त यांचे महत्त्व समजले सर्व विद्यार्थी आनंदी व समाधानाने शाळेत सुखरूप परतले.



