Home Breaking News लॉयन्स क्लब संस्कृती अन्नसेवा उपक्रमास १००० दिवस पुर्ण..!

लॉयन्स क्लब संस्कृती अन्नसेवा उपक्रमास १००० दिवस पुर्ण..!

शासकीय रुग्णालयात गरजूंना होतेय प्रतिदिन भोजन वाटप

खामगाव-(अजयसिंह राजपूत) शहरात सामाजिक सेवा कार्यात सदा अग्रेसर लॉयन्स क्लब संस्कृती खामगांव द्वारे १ फेब्रुवारी २०२१ पासून स्थानिक शासकीय रुग्णालय येथे प्रतिदिन दुपारी १.०० वाजता रूग्णाच्या नातेवाईकांना मोफत भोजन वाटप टप करण्यात येते. लॉयन्स क्लब खामगांवचे पदाधिकारी व सदस्य नियमित आपल्या उपस्थितीत हे वितरण करतात. वर्षाचे पुर्ण ३६५ दिवस हे सेवा कार्य निरंतर चालत येत आहे. ह्या सेवा कार्यासाठी रूपये २५०० चे सहयोग होवुन आपले वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, आपल्या नातेवाईकाच्या स्मृती प्रित्यर्थ व इतर कोणतेही दिवस असल्यास भोजन वितरण सहयोग राशी दिलेल्या व्यक्तीच्या किंवा त्यांनी सुचविलेल्या नावाने वितरण करण्यात येते. भारत देशातील विविध राज्यामधून व विदेशातुनही ह्या सेवा उपक्रमास सहयोग लाभत आहे.
पाऊस असो उन असो कोणताही सण सुट्टी असो ह्या सेवा उपक्रमासाठी लॉयन्स क्लब संस्कृतीचे सदस्य आपली सेवा देण्यास कर्तव्यबध्द आहे. येणान्या २८ ऑक्टोंबरला सेचा उपक्रमास सतत चालविण्याचे अभिमानास्पद १००० दिवस पुर्ण होत आहे. कोणताही सेवा उपक्रम राबविणे व त्याला सुव्यवस्थीतपणे चालवुन पुर्णत्वाकडे वाटचाल करण्यासाठी जे संगठन कौशल्य लागते त्याचे उन्मुखत उदाहरण म्हणजेच लॉयन्स क्लब संस्कृती हे होय, प्रसिध्द उद्योजक व सेवाभावी व्यक्तीमत्व सुरेशचंद्र संतलाल अग्रवाल यांच्या संकल्पनेतुन उभे राहिलेले इवलेसे रोपाचे आज एका मोठ्या बटवृक्षात रूपांतर झाले आहे. याची प्रचिती म्हणजे ह्या सेवाउपक्रमाचे यशस्वीरित्या पूर्ण होत असलेले १००० दिवसाचा टप्पा गाठत आहे. फक्त भोजन वितरण नसुन लोकांच्या गरजेनुसार सणावाराप्रमाणे भोजन वितरणात बदल करण्यात येतो जेणेकरून प्रत्येकाला त्याचा लाभ मिळो. समाजातील प्रत्येक स्तराकडून ह्या सेबा उपक्रमाची प्रशंसा केली जात आहे व समाजातील विविध घटकाकडून सहयोग मिळत आहे. स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल होत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकासमोर एक वेळ भोजनाचा जो प्रश्न येत होता त्याला आता पुर्णपणे विराम मिळालेला आहे. रूग्णाच्या नातेवाईकांची ही विवंचना आता ह्या सेबा उपक्रमाने पुर्ण झाली आहे.

हा सेवा उपक्रम खामगावकरांच्या शिरपेचात एक तुरा आहे. प्रत्येक खामगांवकरांना अभिमान वाटावा असा हा सेवा उपक्रम फक्त रुग्णाच्या नातेवाईकांना दिलासा देत नसुन आपण ह्या समाजाचे काही देणे लागतो ह्याची जाणीव करतोय ह्या सेवा उपक्रमाला विविध स्तरातुन लाभत असलेला प्रतिसाद हे ह्याचे एक जिवंत उदाहरण आहे. ह्या सेवा उपक्रमासाठी स्थानिक शासकीय रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. निलेशटापरे व रुग्णालयातील सर्व कर्मचान्यांचे सुध्दा सहयोग नेहमीच असतो. ह्या सेबा प्रकल्पाचे प्रमुख एमजेएफ लॉ. अभयकुमार अग्रवाल व त्यांचे सह प्रकल्प प्रमुख एमजेएफ उज्वल गोयनका व लॉयन्स क्लब संस्कृती खामगांवच्या प्रत्येक सदस्याचे ह्या सेवा उपक्रमासाठी निष्ठापूर्ण सेवाभावना सहयोगची भावना असल्याकारणाने आज ह्या सेवा उपक्रमाला अविरत अखंडीत व अतुट १००० दिवस पुर्ण झाल्याचे गौरवमय क्षण लॉयन्स क्लब संस्कृती पुर्ण करत आहे. भविष्यातही ह्या सेवा उपक्रमाला अश्याच भावनेने चालवायचे असुन आपण सुध्दा ह्या सेवाउपक्रमासाठी सहभागी होवु शकता. सहयोग देण्याकरीता एमजेएफ अभयकुमार अग्रवाल मो. ९८२२२२४६४८/ ७९७२९२३०१३ व एमजेएफ उज्वल गोयनका मो. नं.९५११७४७०१७ वर संपर्क साधू शकता. लरील माहिती प्रसिध्दी प्रमुख राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.

Previous articleप्रकाश आंबेडकरांनी जन्माला घातलेला ‘अकोला पॅटर्न’ काय? धम्म मेळाव्याचा असा आहे इतिहास
Next articleअज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार!