Home Breaking News कृषि विभागाच्या सेवेतुन निवृत्त होऊन, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले काका……

कृषि विभागाच्या सेवेतुन निवृत्त होऊन, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले काका……

@ व्यक्तीमत्व विशेष @

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 23 जुलै 2023

💐 सुखदुःखाच्या आडव्या आणि उभ्या धाग्यांनी विणलेला सुंदर रुमाल म्हणजे मनुष्याचे जिवण……💐

मनुष्या जीवणाच्या संघर्षवाटेचे काटे तुटवित जाणारी व्यक्तीची जिवणगाथा लिहितांना मनालाही वेदना होतात..
अश्याचं एका व्यक्तीच्या जिवणपटातील हि अनोखी कहाणी.
वडील पेशाने सवना गावचे व आजुबाजुच्या किमान चार ते पाच गावचे तत्कालीन पोस्टमास्तर. त्यावेळेस त्यांचे शिक्षण म्हणजे चौथी पास असेल. आताचे ते पदविप्रयंतचे शिक्षण मानले जाते. कारण ती त्यांची शिस्त, नियम, निटनिटकेपणा आजही मनाला शिस्तीचे धडे देऊन जातो. हाच त्यांच्या जिवनातील त्यांनी शिकविलेला खरा संस्कार म्हणता येईल.
आपल्या वडीलांच्या संस्कारात वाढलेले, त्याच शिस्तीत, नियम, निटनिटके आणि सामाजिक बांधिलकी जोपासत, ज्यांनी शासनाच्या नियमानुसार वयाची अठ्ठावन वर्षे कृषि विभागात सेवा करुन ते सेवानिवृत्त झाले. समाजांचे आपण काहीतरी देणे लागतो. हाच ध्यास उराशी बाळगून, नांदेड जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालयांचे लिपिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणुन त्यांनी कार्य पार पाडले. त्यानंतर त्यांच्या उत्कृष्ठ कामगिरीची दखल घेत पेरकेवाड, पेरकी समाज सुधारक संघटनेचे नांदेड जिल्हा संघटनेचे जिल्हासचिव म्हणुन सध्या ते अतिशय निर्विवादपणे कामगिरी करत आहेत.
त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आमच्या सारख्या छोट्या युवा कार्यकर्त्याला समाजाचा तालुका सचिव म्हणुन कार्य करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
असे व्यक्तिमत्व म्हणजे सर्वांचे काका, अंकल म्हणुन परीचित असलेले दिलीपराव परशुराम अनगुलवार सवनेकर यांनी नुकताच, सवना ज. सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सक्रीय सहभाग घेतला आहे. विद्यमान सरपंच तथा खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक परमेश्वर गोपतवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन गावातील शेतकरी बांधवांची सेवा करण्यासाठी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सक्रीय सहभाग त्यांनी घेतला. विद्यमान सरपंच यांच्यासोबत आपणही काही गावांसाठी काही देणे लागतो. म्हणुन सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम. जे. बिरकलवार सर, सेवानिवृत्त कॅनल इनेस्पेक्टर देवराव पाटील गोपेवाड, उपसरपंच सोनबा राऊत, मा. सरपंच सिध्दार्थ राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास अनगुलवार, राजेश्वर जाधव, राजेश्वर लक्ष्मणराव अनगुलवार, रविद्र अनगुलवार, साहेबराव बिरकलवार, आडेलु महाराज, विनायक पाटील, लक्ष्मण गायकवाड, राजु पाटील गोपेवाड, गणेशराव भुसाळे, नंदु राऊत, संजय राऊत, संदिप बिरकलवार, भिमराव राऊत, गणपत राऊत, आनंद बुटटणवाड, सोनबा अनगुलवार, गोविंद अनगुलवार, दिलीप आडे, विजय जाधव, प्रेमसिंग दादा, सर्व रमणवाडीकर बंधु आदिनी आपले सामाजिक कार्यास योगदान देण्याचे ठरविले आहे.

Previous articleअतिवृष्टी मध्ये रहिलेल्या पीकांची संगोपन करण्यासाठी शेतकरी सज्ज !
Next articleरोहयो फळबाग लागवड योजनेतील लाभार्थ्यांची होतेय कर्मचा-याकडून प्रचंड लूट