Home Breaking News नरसी येथील ओबीसी एल्गार मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे….. ओबीसी नेते अँड....

नरसी येथील ओबीसी एल्गार मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे….. ओबीसी नेते अँड. सचिन नाईक

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 04 डिसेंबर 2024

राज्य शासनाकडून होत असलेली राज्य घटनेची पायमल्ली चिंतेचा विषय ठरत असून, आपल्या अर्थिक, सामाजिक न्यायासाठी ओबीसींनी आता जागरूक पणे लढा उभारावा. आपल्या आरक्षणाचा वाटेकरी कुणी होवू पहात असेल, तर ते ओबीसींनी खपवून घेवू नये, आपल्या न्याय हक्कांसाठी जागरूक होवून, शासनाच्या विरोधात लढा उभारला जात असून नरसी, नायगाव, येथे दि. ७ जानेवारी रोजी होणाऱ्या ओबीसी जनजागरण एल्गार मेळाव्याला हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधवांनी उपस्थित रहावे. असे अवाहन ओबीसींचे नेते अँड. सचिन नाईक यांनी केले आहे.

हिमायतनगर येथील महात्मा फूले सभागृहात ता. ४ गुरूवारी नरसी, नायगाव येथे ७ जानेवारी ला होत असलेल्या ओबीसी महामेळावा एल्गार सभेच्या पुर्व तयारीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या वेळी आयोजित कार्यक्रमात अँड. नाईक बोलत होते. पुढे बोलतांना अँड. सचिन नाईक म्हणाले की, राज्यात सध्या अराजकता माजलेली पहाव्यास मिळत आहे. घटनेच्या कलमालाच अवाहन आताचे सरकार देत असल्याने हा विषय अतिशय गंभीर स्वरूपाचा बनला आहे. ओबीसींनी आता जागरूक होणे काळाची गरज आहे. आणी म्हणून जास्तीत जास्त संख्येने नरसीच्या मेळाव्याला आपण उपस्थित रहावे. असे अवाहन ही अँड. सचिन नाईक यांनी केले. हिंगोलीचे ओबीसी नेते अँड. रवि शिंदे म्हणाले की, राज्य शासनाकडून घटनेचे पावित्र्य भंग करण्याचे पाप होत आहे. हे ओबीसींनी खपवून न घेता शासनाच्या विरोधात लढा उभारला पाहीजे, नरसीच्या मेळाव्यात महाराष्ट्रातील सर्वच ओबीसी नेते येत्या ७ तारखेला उपस्थित राहणार आहेत. या महा मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहाण्याचे अवाहन अँड. रवि शिंदे यांनी केले. प्रास्तविक डाॅ. दामोधर राठोड व माजी नगरसेवक प्रभाकर अण्णा मुधोळकर यांनी केले. तर सूत्रसंचालन पत्रकार व ओबीसी संघटणा अध्यक्ष बाबाराव जरगेवाड यांनी केले, तर अभार सुभाष दादा शिंदे यांनी मानले.

या वेळी बळीराम देवकते, प्रभाकर अण्णा मुधोळकर, दिलीप राठोड, पर्वत काईतवाड, संजय काईतवाड, बाबाराव जरगेवाड, डाॅ. सुनील ढगे, आनंद मुतनेपवाड, अभिषेक बकेवाड, आदिंची प्रामूख्याने उपस्थिती होती.

Previous articleखामगाव प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिनी विविध पुरस्कारांचे वितरण..
Next articleहिमायतनगर शहराजवळील नव्याने बांधलेल्या पुलास पडले भगदाड!