
अकोला जिल्हा अध्यक्षपदी चंदन जंजाळ तर बाळापूर तालुकाध्यक्ष संतोष मोरे यांची नियुक्ती
बाळापूर/:-आज दिनांक २६/१२/२५ रोजी बौद्ध विहार सभागृह बाळापूर येथे नॅशनल व्हॉईस मिडिया फोरम ची बैठक आयोजित करण्यात आली होती.कार्यक्रमाची सुरुवात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध, यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलित करून करण्यात आली
पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघटित होऊन एकत्रितपणे लढण्याकरिता नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम पत्रकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष उत्तम वानखडे,केंद्रीय महासचिव प्रकाश सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (प्रभारी)देवचंद्र समदूर माजी जिल्हा अध्यक्ष राहुल इंगळे सिद्धार्थ तायडे राहुल सोनोने निशांत गवई यांच्या नेतृत्वात राज्यभरात संघटनेचा पाया मजबूत करण्याकरिता प्रत्येक जिल्हा व तालुक्या ठिकाणी मिटिंगचे आयोजन करून संघटनेच्या शाखा गठीत करण्यात येत आहेत याच अनुषंगाने या बैठकीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी देवचंद समदूर राज्य संघटक उमेश सिरसाठ बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष शीतल शेगोकार अनिल उमाळे संजय उमाळे नवनिर्वाचित नगरसेवक न प बाळापूर भिमकिरण दामोदर बाळापूर तालुका अध्यक्ष हयांचे प्रमुख उपस्थितीत
संघटनेच्या वतीने देवचंद समदूर यांनी बैठकीत येथील उपस्थित पत्रकारांची जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्हा अध्यक्ष म्हणून चंदन जंजाळ, जाकीर अहमद उपाध्यक्ष तर महासचिव म्हणुन भिमकिरण दामोदर हयांची निवड करण्यात आली.बाळापूर तालुका अध्यक्ष म्हणून आपला जिल्हा महाराष्ट्र न्युज चे प्रतिनिधी संतोष मोरे यांची निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष संजय इंगळे ,महासचिव श्रीकृष्ण पवार, तालुका संघटक अनिल मोरे हयांची निवड करण्यात आली प्रसंगी उपस्थित म्हणून संजय उमाळे नवनिर्वाचित नगरसेवक हयांचे शाल व शिलफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभार बाळापूर तालुका माजी अध्यक्ष भिमकिरण दामोदर यांनी केले.



