Home Breaking News लोहारा गावातील अक्षय वावरे यांची मुंबई पोलीस पदी नियुक्ती नागरिकांनी केला सत्कार 

लोहारा गावातील अक्षय वावरे यांची मुंबई पोलीस पदी नियुक्ती नागरिकांनी केला सत्कार 

भुमीराजा न्यूज प्रतिनिधी/ संतोष मोरे 

नॅशनल व्हाईस फोरम मिडिया संघटना बाळापूर व गावातील नागरिकांनी जाहीर सत्कार केला*

बाळापूर:- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील अक्षय वावरे यांची मुंबई पोलीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल गावातील नागरिकांनी जाहीर सत्कार केला. अक्षय यांचे शिक्षण पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण गावातच झाले अक्षयला पहिल्यापासून देशांची सेवा करण्याची इच्छा होती. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. परंतु आपला अंगावरती वर्दी घालायची आहे. ही जीद मनात ठेवून तो तयारी करू लागला कित्येक वेळा हाता निराशाच आली. तरी न थांबता पुन्हा जिद्दीने उठून तयारी करीत राहिला व तो सोन्याचा दिवस उजाडला अक्षय वावरे यांची मुंबई पोलीस म्हणून नियुक्ती झाली. हि माहिती मिळताच गावातील नागरिकांनी व नॅशनल व्हाईस फोरम मिडिया संघटना बाळापूर यांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत केले. यावेळी उपस्थित म्हणून राजु मोरे, रुपेश ठाकुर, धम्मपाल मोरे , सुनील मोरे, तानाजी मोरे, कोतवाल प्रशांत राठोड, विकास मोरे, अक्षय मोरे, सुभाष मोरे, नॅशनल व्हाईस फोरम मिडिया बाळापूर तालुका अध्यक्ष संतोष मोरे, अकोला जिल्हा महासचिव भिमकिरण दामोदर, संजय इंगळे, अनिल मोरे, श्रीकृष्ण पवार, व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleअनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधात अकोल्यात भव्य मूक महामोर्चा; हजारोंच्या उपस्थितीत तीव्र निषेध
Next articleहिमायतनगर तालुक्यात पेट्रोल टंचाई…