मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 12 जुनं 2026
हिमायतनगर तालुक्यातील मौजे कार्ला पि. येथील शेतकरी कुटुंबातील बोपिंलवार बंधुनी संगित क्षेत्रात विदयापिठातील अवघड असणारी *पि.एच.डी.* पदवी एकाचवेळी , एकाच कुटुंबातील दोन बंधुनी संपादन केल्यामुळे तालुक्यातुन त्यांत्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे..
प्रा.ज्ञानेश्वर बोंपीलवार, डाॅ. नामदेव बोपिंलवार यांनी संगीत विषयांत पिएच डी पदवी संपादन केल्याबद्दल कारला पि. गावी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागोराव पाटील चव्हाण, मारोती देवकर सर,भगवानराव गुंफलवाड, रामराव पाटील लुम्दे,गजानन पाटील, शिवाजी एटलेवाड,बालाजी मिराशे,व भजनी मंडळ व परिवार आदी उपस्थित होते.




