वुमन लीडर महाराष्ट्राच्या पदी हर्षा सिरसाट, जिल्हाध्यक्षपदी निलेश हिवराळे व महिला जिल्हाध्यक्ष विद्याताई आकोडे यांच्यावर जबाबदारी
पातूर तालुका प्रतिनिधी
पोलीस मित्र अपराध नियंत्रण एवं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या सामाजिक संघटनेत महाराष्ट्र व अकोला जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ताहीर जाफरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजहंस वाडे यांच्या नेतृत्वात या नियुक्त्या करण्यात आल्या.
यामध्ये हर्षा सिरसाट यांची महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटी वुमन लीडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच निलेश हिवराळे यांची अकोला जिल्हाध्यक्ष तर विद्याताई आकोडे यांची महिला जिल्हाध्यक्ष, अकोला म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्त्यांमुळे संघटनेच्या सामाजिक, मानवाधिकार व जनजागृतीच्या कार्याला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांवर संघटनेची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविणे, सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणे तसेच नागरिकांच्या हक्कांसाठी कार्य करणे ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीनंतर बोलताना हर्षा सिरसाट, निलेश हिवराळे आणि विद्याताई आकोडे यांनी संघटनेच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. संघटनेचा विस्तार वाढविणे, महिला सक्षमीकरण, मानवाधिकार संरक्षण आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबविण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या नियुक्त्यांचे अकोला जिल्ह्यासह विविध स्तरांवर स्वागत करण्यात येत असून सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून नव्या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी या नियुक्त्या महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.




