कृष्णा घाटोळ
भूमिराजा शहर प्रतीनिधी बाळापुर दि. 30/8/2022
शहरातील कासारखेड विभागातील नागरीकांनी अरूंद रस्त्यावर अवैध पद्धतीने उभी असलेली वाहने हटवा या साठी मागणी केली होती.त्या मागणी कड़े नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्षित केले असुन मात्र त्या
दुर्लक्षित मागणी ची दखल पोलीस प्रशासनाने घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे.शहरातील कासारखेड विभागासह इतर टिकाणी अवैध पद्धतीने वाहने उभी केली जातात.यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो.या बाबत अनेक वेळा बाळापुर उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार आणी नगर परीषदेच्या मुख्य अधिकारी यांना लेखी निवेदन मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी दिले होते.मात्र या समस्येवर दुर्लक्ष होत होते.नुकत्याच झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत हा मूद्दा मंडळाच्या कार्यकर्ता व पदाधिकार्यानी मांडला. तेव्हा प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून कारवाही चे आश्वासन पोलिस अधिकार्यानी न.प बाळापुर यांना दिले.अप्पर पोलिस अधिक्षकांनी प्रत्यक्ष पाहणी करून समस्येच निराकरण करण्यासाठी रहदारीस अडथळा आणणार्ऱ्या वाहनांवर कारवाही चे आदेश दिले.