Home Breaking News भटक्या, विमुक्तांचा केंद्रामध्ये ‘ ड़ी एनटी ‘ त समावेश

भटक्या, विमुक्तांचा केंद्रामध्ये ‘ ड़ी एनटी ‘ त समावेश

मागसवर्ग आयोगाच्या सदस्यांची माहिती

हेमंत शिंदे नाशिक जिल्ह्य संपादक भूमिराजा न्युज

राज्यातील भटक्या विमुक्तांचा केंद्रात ‘ ड़ीएनटी ‘ मध्ये समावेश करण्यात येणार आहे.त्यामुळे या वर्गातील नागरिकांना विविध सुविधाचा लाभ मिळणे शक्य होणार आहे.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजाचे ( ड़ीएनटी ) सचिव तसेच राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य यांची पुण्यात बैठक झाली.त्या बैठकीत आयोगाचे सदस्य संजी व कोहली, सागर किल्लारीकर, लक्मण हाके, निवृत्त न्यायमंत्री चंदलाल मेश्राम आणि भटक्या जातीमधील प्रतिनिधी आदी उपस्थित होते.बैठकी नंतर सर्व सदस्यांनी पत्रकारांशी संवाद साध ला.
राज्यातील भटक्या विमुक्तांचा समावेश आता केंद्रात ‘ डीएनटी ‘ मध्ये आता होणार आहे, त्यानुसार भटक्या विमुक्त जाती मधील नागरिकांना शिक्षणाच्या योजना, स्पर्धा परीक्षा शुल्काचा खर्च केंद्र सरकार करणार आहे.’ आयुषमान भारत ‘या योजने च्या धर्तीवर आरोग्य विमा केला, तर त्याच्या कुटुंबाला पांच लाख रूपये मिळतील. या जमातीतील नागरिकांन साठी केंद्र सरकारच्या मदतीने घरांची योजना सुरु करण्यात येणार आहे.’ सेल्फ हेल्थ गुड़ ‘ साठी आर्थिक योजने अंतर्गत 200 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया -:हेमंत शिंदे
( नाशिक जिल्हा संघटक )
अखिल भारतीय ओबीसी महासभा

महाराष्ट्रात शिक्षण व नौकऱ्या मध्ये भटक्या – विमुक्ताना 11 % आरक्षण आहे. त्यामध्ये अ, ब, क, ड, असे चार प्रवर्ग तयार करण्यात आले आहे. या प्रवर्गातील नौकऱ्या मधील आरक्षण परिवर्तणीय असल्यामुळे काही प्रवर्गाना पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नाही, तरी ज्या प्रवर्गला जो आरक्षणाचा कोटा ठरविला आहे, त्याप्रमाणात च त्यांना नौकऱ्या मधील जागा मिळाल्या पाहिजे. त्याप्रमाणे शास न अंबलबजावणी करत नाही व काही प्रवर्गवर अन्याय होत आहे. तरी या बाबतीत शासनाने ठोस धोरण ठरविणे अत्यावश्यक आहे.

Previous articleकासारखेड रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाईचे अप्पर पोलीस अधिक्षकांचे आदेश
Next articleजल्लोषात स्वागतासह बाप्पा घरोघरी विराजमान