बाळापुर तालुका प्रतिनिधी योगेश घायवट
“भीम श्री 2023” विदर्भस्थरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा आज पातूर येथे पार पडली ह्या कार्यक्रमाचे आयोजन निर्भय पोहरे ह्यांनी केले होते. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र भाऊ पातोडे तर उद्घाटक म्हणून बाळापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख हे उपस्थित होते.
त्याप्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्ह्याची टीम तिथे प्रामुख्याने उपस्थित होती, त्या मध्ये जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख ॲड. प्रशिक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष निलेश इंगळे, संतोष गवई, ॲड. सुबोध डोंगरे, जिल्हा सचिव आनंद खंडारे, श्रीकृष्णा देवकुणबी, तसेच सचिन शिराळे, धमेंद्र दंदी, मेजर गुलाब उमाळे, विशाल दंदी, हे सर्व उपस्थित होते