अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनीधी
हिमायतनगर – तालुक्यातील मौजे सरसम ( बु) येथे दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव,विश्वरत्न,बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई माता भिमाई रामजी आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
सर्वप्रथम माता भिमाई रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रमाई स्वयं सहायता बचत समूहाच्या अध्यक्षा कालींदा नारायण वाठोरे या होत्या. यावेळी पत्रकार विजय वाठोरे यांनी माता भिमाई यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला. यावेळी ते म्हणाले कि पूर्वी शूद्र,अतिशूद्र म्हणून हिणवणाऱ्या समाजाला आज घडीला जे स्वातंत्र्य,समता, बंधुता आणि एवढे सुख सुविधा प्राप्त झाल्या आहेत.त्या फक्त आणि फक्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच झाल्या आहेत आणि या थोर समाजसुधारकाला जन्म देणाऱ्या माता भिमाई यांच्यामुळेच आपल्याला हे सर्व मिळाले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पिता रामजी आंबेडकर व त्यांच्या परिवाराला सांभाळणाऱ्या तसेच लेकरा बाळांवर योग्य ते संस्कार करणाऱ्या माता भीमाईच होत्या. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मानंतर अवघ्या पाच वर्षातच त्यांचा मृत्यू झाला.त्यांनी त्यांचे जीवन आंबेडकर घराण्यासाठी अहोरात्र झिजविले.यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जन्म देणाऱ्या भीमाईचे कार्य समाजाने विसरता कामा नये.आजच्या माता माऊल्यांनी माता भीमाईचा आदर्श घ्यावा.
यावेळी या कार्यक्रमास रमाई स्वयंसहायता समूहाच्या सचिव रुपाली कांबळे, संघप्रिया कवडे, आम्रपाली नगराळे, माजी सरपंच शेषेकला नगराळे, बालाजी कांबळे, मायावती कांबळे, कमलबाई कांबळे,वंदना नगराळे,संजय वाठोरे, सरस्वताबाई कांबळे, प्रभावती कांबळे,राजू नगराळे, अमन नगराळे,दिशांत कांबळे,दक्ष कवडे यांच्यासह आदीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.



