मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 01 मार्च 2025
हिमायतनगर तालुक्याचे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (कृषी) देशमुख यु. एन. हे शासकिय नियमांना नुसार वयोमानाप्रमाणे 28 फेब्रुवारी सेवानिवृत्त झाले आहेत.
त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनात आपली पस्तीस वर्षे सेवा करत शेतकरी, सर्वसामान्य नागरीकांचे कामांचा प्राधान्य देत सेवा पुर्ण केली आहे. देशमुख साहेब अतिशय शांत, संयमी सहकार्य करणारे अधिकारी म्हणुन ओळखले जात होते. आपल्या मनोगत व्यक्त करतांना ते म्हणाले की वरिष्ठांचे मार्गदर्शन, सहकारी कर्मचारी व मित्र परिवाराचे अनमोल सहकार्य मिळाल्यामुळे हा सेवापुर्ती काळ करणे शक्य झाले आहे. त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. यावेळी त्यांचा पुष्पहार, शाल साडीचोळी, श्रीफळ देऊन सहपत्नीक सत्कार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जाधव साहेब यांनी केला आहे.
यावेळी तहसिलदार टेमकर मॅडम, सातपुते साहेब सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते..सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या आहेत..



