Home Breaking News पोद्दार स्कूलची विद्यार्थिनी आराध्या पाठक ने बनविले कडुलिंबाचे किटकनाशक..!

पोद्दार स्कूलची विद्यार्थिनी आराध्या पाठक ने बनविले कडुलिंबाचे किटकनाशक..!

संदिप देवचे 9860426674

खामगाव:- स्थानिक पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी आराध्या पाठक हिने रासायनिक किटकनाशकांच्या हानिकारक प्रभावापासून वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी, कडुलिंबाची पाने आणि लसूण वापरून एक किटकनाशक तयार केले. डॉ. होमी भाभा बालशास्त्र स्पर्धेत तिला तिसऱ्या चयन मध्ये संधी मिळाली आहे. ती डॉ. होमी भाभा चाइल्ड वैज्ञानिक स्पर्धेच्या सस्टेनेबल लँडस्केपिंग या कृती संशोधन प्रकल्पावर शिवांगी बेकर्स येथे काम करत आहे.या किटकनाशकाच्या वापराने शेती रासायनिक कीटकनाशकांच्या गंभीर परिणामा पासून मुक्त होईल.कडुनिंब एक अप्रतिम झाड आहे ज्याला डॉक्टराची उपमा दिली जाते. औषधी गुणधर्म त्याच्या पानांपासून ते वाळलेल्या सालापर्यंत लपलेले असतात. निंबोळी आणि अगदी पानाचा देखील औषधी वापर करता येतो.या विषयी शिवांगी बेकर्सच्या कर्मचारी व कामगारांना माहिती दिली.यावेळी कंपनीचे संचालक अभय अग्रवाल, रितेश केडिया, कर्मचारी व कामगार बहुसंख्येने उपस्थित होते. तिने शाळेतील मुलांनाही सस्टनेबल लँडस्केपिंगबद्दल माहिती दिली असून शाळेचे मुख्याध्यापक डॉ.अनिल आर छाडी सरांनी तिचे अभिनंदन केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आराध्या पाठकने एनएसओ आणि आयएमओमध्ये झोनल स्तरावरही यश मिळवले आहे. ती बालशास्र वैज्ञानिक स्पर्धेसाठी मुंबईला जाणार असल्याचे तिने सांगितले.

Previous article@ छाटले जरी मला @
Next articleमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील लाभार्थ्यांची रेल्वे नांदेड येथून रवाना