👉 उपविभागीय कृषि अधिकारी आर. डी. रणविर यांचे प्रतिपादण
कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
तालुक्यातील मौजे पळसपुर येथे आज सेंद्रिय शेतीचे आयोजन करण्यात आले. झपाटयाने वाढत चाललेले प्रदीर्घ आजार कॅन्सर बि. पी, शुगर , पॅरालीसीस, हृदयरोग, यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये धोका वाढत चाललेला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त कॅन्सरचे प्रमाण पळसपुर गावामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये खूप फोफावत चालला आहे. जर वेळीच त्यांचे उच्चाटन केले तर कॅन्सर जागीच थांबेल, अन्यथा प्रत्येक घरामध्ये तो पसरेल या भीतीने कृषी विभाग मीटिंगमध्ये पळसपुर गावातील वाढते कॅन्सरचे प्रमाण याविषयी चर्चा झाली आणि कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केले. त्या कार्यक्रमाला गावातील लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्या कार्यक्रमांसाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून आर डी रणवीर सर
(उपविभागीय कृषी अधिकारी किनवट) यांनी मार्गदर्शन केले.
सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही आणि लिंबोळी अर्कांचा फवारणीसाठी गरजेचे आहे. दशपर्णी अर्कांचा समावेश करणे गरजेचे आहे तसेच जीवामृत हे सुद्धा करणे गरजेचे आहे यांचे मार्गदर्शन व माहिती दिली त्यांनी मार्गदर्शन देताना आज कॅन्सर का वाढत चाललेला आहे आणि त्याचे प्रमाण अजून दहा वर्षात प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल तर वेळी च त्यांचे नियोजन करून त्यावर उपाययोजना नाही केल्या किंवा सेंद्रिय शेतीकडे जर नाही वळालो तर पळसपुर गावातील शेतकऱ्यांना अनेक प्रदीर्घ आजारांचा सामना करावा लागणार आहे या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे कृषी अधिकारी
बाला प्रसाद बंदेल (तालुका कृषी अधिकारी हिमायतनगर)
यांनी सुद्धा सेंद्रिय शेती हा शेती आणि शेतकरी वाचवण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे सर्वांनी मिळून गटाने आणि एकत्र रीतीने समस्या सोडून शेती ही आधुनिक पद्धतीने तसेच पारंपारिक शेतीच्या मागे न लागता आधुनिक शेतीची कास धरून फळबाग तरुण शेतकऱ्यांनी वळाले पाहिजे असे मार्गदर्शनात संबोधीत केले त्याचबरोबर
निलेश वानखेडे मंडळ कृषी अधिकारी हिमायतनगर..यांनी कृषी विभागांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती देण्यात आली..
डॉ प्रभाकर साहेब.. कॅन्सरचे प्रमाण का वाढत आहे ते येण्यापूर्वी काय काळजी घेतली पाहिजे आणि सर्व शेतकरी बांधवांनी त्याची काय नियोजन केले पाहिजे याविषयी त्यांनी माहिती दिली आहे
डॉ विकास वानखेडे …वैद्यकीय अधिकारी कॅन्सर टाळण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस आहार त्याचबरोबर जास्त फवारलेला भाजीपाला टाळावा त्याबद्दल मार्गदर्शन केले आरोग्याची काळजी स्वतःची स्वतः घेणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले आहे ..
त्याचबरोबर कृषी विभाग सर्वच कर्मचारी वर्ग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त हा विद्यमाने आयोजित केला होता या कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव शिरारपल्लू ,कृषी सहाय्यक ढगे मॅडम ,नंदनवार साहेब, बालाजी माझळकर साहेब, रावते साहेब, जगताप साहेब, चिंचोले साहेब, आत्मा प्रकल्पाचे सहाय्यक घूमनवाड साहेब, कृषी सहाय्यक राहुलवाड साहेब यांचे मार्गदर्शन गावातील सर्व लोकांना लाभले आहे तसेच पळसपुर येथील ग्रामपंचायत यांनी अतिशय सहकारी पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते त्यामध्ये गावातील सरपंच लक्ष्मणराव मांजरे, उपसरपंच गजाननराव देवसरकर, ग्रामपंचायत ,सदस्य संजय वानखेडे , सदस्य मारोतराव वाडेकर नागोराव वानखेडे दिगंबरराव वानखेडे , अविनाश वानखेडे ,दिगंबर देवसरकर, संदीप पाटील वानखेडे या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रकाश राव वानखेडे मा कृ उ बा सभापती , वामनराव पाटील वानखेडे माजी सभापती यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आहे ग्रामपंचायत सदस्यांनी अतिशय चांगले पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्याच बरोबर
नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण: शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती पद्धती, जसे की जैविक खते आणि कीटकनाशके वापरणे, जमिनीची सुपीकता वाढवणे, आणि पाण्याची बचत करणे यासाठी प्रशिक्षण दिले जाते.
आर्थिक सहाय्य:….नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असलेल्या निविष्ठा (उदा. बियाणे, खत) खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
तंत्रज्ञान आणि संसाधनांचा पुरवठा:….शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञान आणि संसाधनांचा पुरवठा केला जातो.
शेतीचे व्यवस्थापन:….नैसर्गिक शेतीमध्ये, जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात, जसे की पीक फेरपालट, आंतरपीक, आणि कंपोस्ट खत.
बाजारपेठेची उपलब्धता:…..नैसर्गिकरित्या पिकवलेल्या मालाला चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात.
नैसर्गिक शेतीचे फायदे:…आरोग्यासाठी चांगले:
रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरल्याने अन्नातून विषारी घटक शरीरात जाण्याची शक्यता असते, तर नैसर्गिक शेतीत पिकवलेले अन्न आरोग्यासाठी सुरक्षित असते.
पर्यावरणासाठी चांगले:….रासायनिक खते आणि कीटकनाशके जमिनीला आणि पाण्याला दूषित करतात, तर नैसर्गिक शेती पर्यावरणाची *काळजी घेते.*
आर्थिकदृष्ट्या फायदेशीर:…नैसर्गिक शेतीमध्ये, खतांचा आणि कीटकनाशकांचा खर्च वाचतो, ज्यामुळे शेतकऱ्यांचा नफा वाढतो…
वरील बाबीवरून असे निकषास आले आहे



