मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 25 जुलै 2025
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौजे लोहगाव या गावातील पेरकेवाड समाजाचे, शेतकरी कुंटुबातुन आलेले अभ्यासात जिद्द, चिकाटी आणी सातत्य ठेवत चिंतमवाड यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन उपशिक्षणाधिकारी या पदासाठी पहिली नियुक्ती परभणी येथे मिळाली. पेरकेवाड, पेरकी समाजातील होतकरु तरुणाने ईतर समाजातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणा-या तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे महाराष्ट् शासन सेवेमध्ये पहिल्यांदाच मोठ्या पदावर नियुक्ती होणारा चमाधव चिंतमवाड हा समाज बांधव आहे. त्यांनी परिस्थितीवर मात करून जिद्द चिकाटी आणि मेहनत करून मिळवलेले यश नक्कीच समाजासाठी भूषणावह आहे. त्यांच्या या यशाबद्दल पेरकेवाड समाज बांधव, नातेवाईक, गावकरी बांधव, गुरुवर्य, मित्रमंडळीनी त्यांना त्याच्या पुढील वाटचालीसाठी भरभरुन शुभेच्छा देत चिंतमवाड यांचे अभिनंदन केले आहे.
साप्ताहिक भुमीराजा परिवारच्या वतीने आणि मी मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर त्यांचे विशेष अभिनंदन करीत आहे.



