हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070
प्रतिनिधी (नाशिक )आज आम्ही काही नाशिककरांनी तपोवन येथील रामसृष्टीतील श्रीराम चंद्र मूर्तीजवळ जाऊन आरती करून सहभाग घेऊन तिथे प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना केली की ,धर्म टिकला पाहिजे ,संस्कृती जपली पाहिजे, टिकली पाहिजेत, आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळा हा मोठ्या उत्साहात ,आनंदात मोठ्या स्वरूपात साजरा झाला पाहिजे, यासाठी देशभरातून विविध आखाड्याचे साधू -संत -महंत- महाराज येणार आहेत ,त्यांचे आम्ही नाशिककर स्वागतच करणार आहोत ,त्यांची सेवा करणार आहोत. परंतु ज्या प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाई, श्री लक्ष्मण ,यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पंचवटीतील तपोवन भूमी आणि या भूमीत त्यांनी केलेले तप हे ऐतिहासिक असून या ठिकाणी जे उरलेले 54 एकरातील झाडे आहेत, ती झाडे कापली जाऊ नये अशी आज आम्ही प्रभू श्रीराम चरणी आरती करून प्रार्थना केली,
कारण पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी भविष्यात सूर्य -चंद्र असेपर्यंत ज्या पद्धतीने प्रभू श्रीरामचंद्राचे नाव राहणार ,या ठिकाणी प्रभू श्रीराम चंद्राची आरती चालू राहणार ,त्याच पद्धतीने प्रभू श्रीरामचंद्राच्या नावाने ओळखली जाणारी ही पंचवटी आणि तपोवन भूमी ही पुढच्या पिढीला अशीच माहिती राहिली पाहिजेत.
पुढच्या पिढीला या भूमीचे महत्त्व कळाले पाहिजेत ,म्हणून या धार्मिक महत्त्व असलेल्या तपोवनातील सरकारने एकही झाड कापू नये अशी आम्ही प्रार्थना केलेली आहे. जय श्रीराम!
याप्रसंगी दत्तू बोडके, समाधान बागल ,निवृत्ती धात्रक ,स्वप्नील घिया,श्याम गोसावी जगन काकडे मुकेश गांगुर्डे, विशाल पाटील व इतर नाशिककर आणि श्रीराम भक्त उपस्थित होते.



