Home राजकारण कारला सोसायटीच्या चेअरमन पदी गंगाराम पाटील चव्हाण तर उपचेअरमन पदी संजय घोडगे...

कारला सोसायटीच्या चेअरमन पदी गंगाराम पाटील चव्हाण तर उपचेअरमन पदी संजय घोडगे ,यांची बिनविरोध निवड.

हिमायतनगर प्रतिनिधी/ कृष्णा राठोड
तालुक्यातील कारला येथील सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचे 11 उमेदवार विजयी झाले आहेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काल 25 रोजी चेअरमन पदाची व उपचेअरमन यांची निवड करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली सदरील बैठकीत सर्वानुमते बिनविरोध गंगाराम पाटील चव्हाण यांची चेअरमन पदी तर उपचेअरमन पदी संजय चांदराव घोडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे कार्ला येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली असून निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या 13 पैकी 11 उमेदवारांना विजय मिळाला आहे संस्थेच्या चेअरमन पदाची निवड काल 25 रोजी डि.यु.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेमध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली प्रथम चेअरमन यांचे नाव जाबुवंत मिराशे यांनी सुचवले असून त्यास संभाजी सूर्यवंशी यांनी अनुमोदन दिले तर उप चेअरमन पदासाठी संजय घोडके यांचे नाव पंजाब कांबळे यांनी सुचवले तर अनुमोदन रामराव लुमदे. यांनी दिले. ठरावाचे वाचन संस्थेचे सचिव नंदू अलकटवाड. यांनी केले. यावेळी संचालक गंगाराम पाटील चव्हाण, केशव रासमवाड,रामराव लुमदे,भुजंग रासमवाड.,संजय सूर्यवंशी कांताबाई कदम पंजाब कांबळे,जाबुवंत मिराशे,अनसाजी मोरे,संजय घोडगे, परमेश्वर उत्तरवार,
यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार युवा सेनेचे तालुकाप्रमुख विशाल राठोड, गजानन चायल, अनिल भोरे,राम नरवाडे,पापा शिंदे,यांनी केला यावेळी बाळू रासमवाड,भीमराव लुमदे,आत्माराम मोरे,सुनील घोडगे ,संजय मोरे ,लक्ष्मण ढाणके,नाथा मोरे.शिवप्रसाद सगर, यांच्यासह आधीची उपस्थिती होती.

Previous articleहुजपा च्या रा से यो शिबिरार्थीनी केले महामानवाच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण
Next articleअपघातग्रस्त मुलाला वाळकेवाडी ग्रामस्थांचा मदतीचा हात…!