Home Breaking News हदगाव हिमायतनगर विधासभा कार्यक्षेत्रातील जन सामान्याचा नेता….

हदगाव हिमायतनगर विधासभा कार्यक्षेत्रातील जन सामान्याचा नेता….

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी

हिमायतनगर ( वाढदिवस विशेष लेख )/-जनसामान्य नागरिकांशी नेहमी नाळ जोडून राहणारा कृतिशील विकासाभिमुख लोकनेता म्हणून आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना ओळखले जाते २६ जानेवारी हा आमदार माधवराव पाटील यांचा वाढदिवस लोक कल्याणकारी सामान्याचा कृतीशील विकासाभिमुख नेता आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे बाल पणा पासूनच युवक, शेतकरी, शेतमजूर वृद्ध, निराधार, व्यापारी, कर्मचारी, यांचे लाडके नेते म्हणून दोन्ही तालुक्यात सुपरिचित आहेत.

हदगाव हिमायतनगर तालुक्यात माणसे जातीपेक्षा कर्तव्याने श्रेष्ठ बनतात हे आपल्या कार्य कुशलतेने जवळगावकरांनी दाखवून दिले आहे. माजी मुख्यमंत्री तथा महाविकास आघाडीतील माजी सार्वजनिक बांधकाम माजी मंत्री अशोकराव चव्हाण यांचे एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून आमदार माधवराव पाटील जळगावकर यांना ओळखले जाते. त्यांचे संघटन कौशल्य व निडरपणा, विनम्रपणा, हसतमुख, सात्विक चेहरा सर्वांना आपलासा वाटतो. त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येक माणूस कधीच त्यांच्या पासून दूर गेला नाही. १५ ते २० वर्षांचा विकासाचा अनुशेष त्यांनी पूर्वीच्या आमदारकीच्या काळात तब्बल ३५ कोटींची विकास कामे करून हदगाव हिमायतनगर तालुक्याला न्याय दिला. जनतेच्या सुख दुःखात अडचणीच्या काळात साथ दिल्यामुळे ते जनतेला आपलेसे वाटतात. जनतेचे प्रेम व विश्वास संपादन केल्याने ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. मागील पाच वर्षाच्या काळात पराभवाने खचून न जाता दिवस रात्र जनतेचे कामे आई शांताबाई निवृत्तीराव पवार यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना हदगाव हिमायतनगर तालुक्याला भरमसाठ निधी खेचून आणला. एक एक कार्यकर्ता जोडत शहर, गाव, वाडी, तांड्यावरील जनतेच्या अडचणी त्यांनी सोडविल्या जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी झाल्याने आमचा नेता म्हणून जनता त्यांना चाहते. हिमायतनगर तालुक्यात त्यांच्यामुळे बहुतांश ग्रामपंचायत व सेवा सहकारी सोसायटी काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत

Previous articleओबीसी राजकीय आघाडी’ लोकसभेच्या 48 व विधानसभेच्या 288 जागा लढणार..!
Next articleमौजे वरुड तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा आज दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा येथे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न