Home Breaking News हिमायतनगर शहरातील आठवडी बाजाराची नियमानुसार हराशी होत नसल्याने 29 मार्च रोजी शिवसैनिक...

हिमायतनगर शहरातील आठवडी बाजाराची नियमानुसार हराशी होत नसल्याने 29 मार्च रोजी शिवसैनिक विठ्ठल ठाकरे यांचे आमरण उपोषण..

हिमायतनगर प्रतिनिधी /.. कृष्णा राठोड
शहरातील नगरपंचायत हद्दीमधील शासनाच्या नियमाप्रमाणे शहरातील रोज बाजार, आठवडी बाजार, शेळी बाजार ,व बैल बाजार ची हराशी दरवर्षी वर्तमानपत्रातून जाहीर प्रकटन प्रकाशित करून ती करण्यात येते पण मागील एक वर्षापासून ही हराशी नियमानुसार होत नाही व ह्या वर्षी पण नगर पंचायत चे कर्मचारी व अधिकारी अशीच करणार असल्याचे कळताच दिनांक 29 मार्च रोज मंगळवारी ठीक अकरा वाजता नगरपंचायत कार्यालयासमोर ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे यांनी आमरण उपोषण करणार असल्याचे एक लेखी निवेदन प्रशासनास दिले आहे

दरवर्षी शासन नियमाप्रमाणे हिमायतनगर नगरपंचायत कडून शहरातील रोज बाजार, आठवडी बाजार ,शेळी बाजार व बैलबाजार ची हराशी ही शासन नियमाप्रमाणे वर्तमानपत्रात जाहीर प्रगटन देऊन करण्यात येते पण मागील काही दिवसा पासून शहरातील काही राजकीय लोकप्रतिनिधींना हाताशी धरून काही बड्या व्यापाऱ्यांनी आपला मनमानीपणा चालवत ह्या हराशी वर आपला डोळा ठेवून येथील नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून परस्पर ही हराशी घेत आहेत त्यामुळे सन 2022-23 ची रोजबाजारची हराशी शासनाच्या नियमाप्रमाणे जाहीर प्रगटन काढून करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करून नगरपंचायत कार्यालय समोर दिनांक 29 मार्च रोजी अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे यांनी दिला

जाहिरातीसाठी व बातम्यांसाठी संपर्क साधा:-

कृष्णा राठोड
भूमीराजा न्युज तालुका प्रतिनिधी, हिमायतनगर

Previous articleरस्त्यावर पडल्याने गिट्टीने अपघातास आमंत्रण….
Next articleमौजे पळसपुर येथील विविध विकास कामांचे भुमीपुजन व सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा….