Home Breaking News कृषि विभागांतर्गत आपल्या शेतावर खरीप हंगाम मोहीमेचे आयोजन.

कृषि विभागांतर्गत आपल्या शेतावर खरीप हंगाम मोहीमेचे आयोजन.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकरजिल्हा संपादक नांदेड दिनांक – 12 में 2024

हिमायतनगर तालुक्यातील
तालुका कृषी कार्यालय हिमायतनगर यांच्या सौजन्याने कृषी विभाग आपल्या शेतावर. खरीप हंगाम 2024 मोहीम अंतर्गत मौजे आंदेगाव येथे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव साहेब, कृषि अधिकारी व पर्यवेक्षक काळे साहेब, मंडळ कृषी अधिकारी श्री. वानखेडे साहेब, कृषी सहाय्यक सौ. स्वाती ढगे मॅडम यांनी माती नमुने कसे घेणे, मागेल त्याला शेततळे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, नाडेप, गांडूळ खत योजना, गोगलगाय निर्मूलन , सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेती, एकात्मिक खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, घरीच लिंबोळी अर्क तयार करणे, शेतकरी मासिकाचे फायदे, खरीप हंगाम साठी घरच्याच सोयाबीनची उगम क्षमता तपासून तेच बियाणे पेरणीसाठी वापरून शेतीवर होणारा खर्च कमी करणे. याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच गावातील नाल्याचे लोकसहभागातून खोलीकारण व सरळीकरणाचे काम करण्याकरिता गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन 50000.00 रुपये जमा केले.
सदरील कार्यक्रमास सरपंच धम्पपाल वाढवे पोलीस पाटील माधवराव निलकंठे, कांताबाई वाढवे गावातील सौ. कांताबाई थोटे, ललिताबाई बरदेवाड, कविता कटकवाड व इतर महिला शेतकरी तसेच दत्ता गटकपवाड,गोविंदराव भुसावळे, मारुती कटकमवाड,विठ्ठल देशमवाड, कानबाराव नाईक,राजू पोटेवाड, साईनाथ शिंदे, सिंधू वडेवाड, दत्ता नलावडे, नरसिंग वड्डेवाड, रामदास कटकमवाड, ज्ञानेश्वर चीकल्पले, लक्ष्मण पालजवाड चिमणाजी थोटे यल्लाप्पा बकेवाड इत्यादी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleकवी सर्जेराव चव्हाण यांना ‘ राष्ट्रकवी तुकाराम साहित्य पुरस्कार .
Next articleहिमायतनगर येथील महावितरण उपविभाग कार्यालयावर लाईट सुरू करण्याच्या मागणी साठी शेतकरी व मुक्या जनावरांना मोर्चा धडकला…