Home Breaking News लोकनेते आमदार माधवराव पाटील जवळगावकरांच्या वाढदिवसानिमित्त वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप…..

लोकनेते आमदार माधवराव पाटील जवळगावकरांच्या वाढदिवसानिमित्त वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप…..

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी

हिमायतनगर काँग्रेस कमिटीच्या वतीने आदिवासी विध्यार्थ्यांना विविध शालेय साहित्य वाटप ….

हिमायतनगर येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत व हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे लोकनेते आदरणीय माधवरावजी पाटील जवळगावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हिमायतनगर शहरातील “आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह” येथे गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना तालुका काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाच्या वतीने शालेय

साहेबांनी राजकारणाच्या आधी समाज साहित्य वितरीत करण्यात आले.कारण करण्याची जी शिकवण आम्हा कार्यकर्त्यांना दिली ती शिकवण जोपासत आम्ही सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवत साहेबांचा जन्मदिवस साजरा केला. याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे.अशी प्रतिक्रिया तालुका काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष, श्री.संतोष आंबेकर यांनी यावेळी दिली. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्ताने त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी वस्तीगृह अधिक्षक, श्रीराघो रामा गाडेकर, सोसायटी संचालक,शिवाजी कदम,मा.रोती खुपसे यांची उपस्थिती होती. तर या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

Previous articleमौजे वरुड तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा आज दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा येथे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न
Next article75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विश्वशांती बुद्ध विहार जय भीम नगर वाडेगाव येथे शिव फुले शाहू आंबेडकर या नावाने अभ्यासिका केंद्र सुरू करण्यात आले